Devendra Fadanvis, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आमदार गोरेंना शब्द; माण-खटावचा दुष्काळी यादीत समावेश होणार

Umesh Bambare-Patil

-विशाल गुंजवटे

Maan Political News : सातारा जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दोन्ही तालुक्यांमधील सध्याची टंचाई परिस्थिती पहाता दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकरी आणि जनतेला दुष्काळी उपाय योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती माण,खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी २१ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस Devendra Fadanvis यांची भेट घेऊन माण आणि खटाव Maan तालुक्यातील अत्यल्प पर्जन्यमानाची आणि टंचाईसदृश्य परिस्थितीची माहिती दिली होती. दोन्ही तालुक्यात झालेला कमी पाऊस, पाणी पातळीतील घट, पिकपेरा आणि उत्पादनातील घट, पिके वाया जाणे, पाण्याची टंचाईची सध्याची स्थितीची माहिती आमदार गोरेंनी दिली होती.

'महा मदत' प्रणालीद्वारे केलेल्या सर्वेक्षणात तृटी राहिल्याने दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी यादीत झाला नाही, त्यामुळे काल पुन्हा आमदार गोरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन खटाव आणि माण तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची तसेच दुष्काळी मदत देण्याची मागणी केली.

यावेळी त्यांनी माण तालुक्यातील ११० गावांची तसेच खटाव तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. एकाही तलाव, मध्यम तसेच लघू प्रकल्पात पावसाच्या पाण्याची आवक झाली नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही तालुक्यांमधील सध्याची टंचाई परिस्थिती पहाता दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकरी आणि जनतेला दुष्काळी उपाय योजनांचा लाभ मिळेल असे सांगितले. Maharashtra Political News

सर्वेक्षणात चुका..

माण - खटावमधील लाभक्षेत्रातील पिकांच्या पानातील आद्रता तपासण्यात आली आहे. सर्वेक्षणात या चुका झाल्या आहेत. आता पुन्हा सर्वेक्षण आदेश निघाले आहेत. लवकरच माण - खटावसह इतर टंचाईग्रस्त तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT