Umesh Patil-Vijay Shivtare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Vs Shivtare : आता शिवतारेंचं शेपूट छाटण्याची वेळ आलीय; उमेश पाटलांचा प्रतिटोला

Umesh Patil News : विजय शिवतारे यांचे व्यक्तिगत आयुष्य आणि इतर बाबी इतक्या खालच्या स्तराच्या आहेत. त्या चव्हाट्यावर आल्यामुळे शिवतारे यांचे व्यक्तिमत्त्व काय लायकीचे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर आले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 23 March : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही माजी मंत्री विजय शिवतारे यांचे शेपूट सरळ झालेले नाही, त्यामुळे आता त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शिवतारे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीतील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या विधानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे सांगून गेली काही दिवसांपासून विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. महायुतीमध्ये असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समजावूनही सांगितले. मात्र, शिवतारे हे अजित पवारांवर टीका करायचे थांबत नाहीत. त्यामुळे शिवतारेंना उमेश पाटील (Umesh Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या विजय शिवतारे यांना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितले आहे. आपण महायुतीमध्ये असल्याने युतीचा धर्म पाळा, अशी सूचना केली आहे. मात्र, त्यानंतरही शिवतारे यांचा अजित पवार विरोध कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगूनही शिवतारे यांचे शेपूट सरळ झालेले नाही, त्यामुळे त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची शिवसेनेतून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.

विजय शिवतारे यांना उमेश पाटील यांनी त्यांच्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा शिवतारेंनी उमेश पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला आज पाटील यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, विजय शिवतारे यांचे व्यक्तिगत आयुष्य आणि इतर बाबी इतक्या खालच्या स्तराच्या आहेत. त्या चव्हाट्यावर आल्यामुळे शिवतारे यांचे व्यक्तिमत्त्व काय लायकीचे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर आले आहे. त्यामुळे त्यांना इतरांची लायकी तपासण्याचा अधिकार नाही.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT