Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Visit To Pandharpur : कलेक्टर, मी कुणालाही सोडणार नाही; हार्ड ॲक्शन घेईन; पंढरपुरात पाणी नसल्याने मुख्यमंत्री संतापले

लोकांना आता पाणी नाही, चाटायची काय तुमची टाकी.

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur News : पंढरपुरातील ६५ एकर परिसरात पाणी नसल्याचे ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ‘लोकांना आता पाणी नाही, चाटायची काय तुमची टाकी. तुम्ही अगोदर टॅंकर का मागावले नाहीत. पैसे नाहीत का? कलेक्टर, याला तुम्ही सर्वजण जबाबदार आहात, मी कुणालाही सोडणार (spare) नाही. मी हार्ड ॲक्शन घेईन, मग रडू नका, असा सज्जड इशाराच संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला. (Chief Minister shinde was furious as there was no water in the 65 acre area of ​​Pandharpur)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवारी सायंकाळी अचानकपणे पंढरपुरातील (Pandharpur) सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांना ६५ एकर परिसरात पाण्याची वाणवा असल्याचे भाविकांनी सांगितले. ते ऐकून मुख्यमंत्री शिंदे यांचा पारा चढला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेत मला अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही, असे स्पष्ट केले.

वारकऱ्यांसमारे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेला संवाद :

मुख्यमंत्री : ६५ एकर परिसरातील बाथरूममध्ये सध्या पाणी नाही.

अधिकारी : पाणीपुरवठ्यासाठी आपल्याकडे दहा टॅंकर राहतात. याशिवाय चार लाख लिटर पाण्याची टाकी आहे. चंद्रभागेमध्ये काल पाणी नव्हतं. आता चोवीस तास पाणी राहील सर.

मुख्यमंत्री : आता पाणी पाहिजे, ते कधी येणार आहे. किती टॅंकर येतील, किती वेळात येतील.?

अधिकारी : अर्ध्या तासात टॅंकर येतील सर. एक टॅंकर वीस हजार लिटरचा असेल.

मुख्यमंत्री : किती टॅंकर येणार?

अधिकारी : आपल्याकडे १० टॅंकर आहेत, वाखरीलाही आपण पाठवतो.

मुख्यमंत्री : तुमच्याकडे टॅंकर भाड्याने मिळत नाहीत का?

अधिकारी : मिळतात, शासनाचे आहेत

मुख्यमंत्री : शासनाचे जाऊ दे, खासगी टॅंकर मिळतात तर तुम्ही का मागवले नाहीत. तुम्हाला पैसे नाहीत का.

अधिकारी : आपली चार लाख लिटरची पाण्याची टाकी आहे.

मुख्यमंत्री (संतापून) : लोकं बोलतात आता पाणी नाही. चाटायची काय तुमची टाकी? तुमची चार लाख लिटरची टाकी कुठे आहे. आता लोकांना पाणी नाही. तुम्ही अगोदर टॅंकर का मागवले नाहीत. पैसे नाहीत का. दिलेत ना पैसे, आणखी किती लागणार तेही देणार आहे. मग तुम्ही का मागवले नाहीत टॅंकर. कलेक्टर याला तुम्ही सर्वजण जबाबदार आहात, मी कुणालाही स्पेअर करणार नाही. मी हार्ड ॲक्शन घेईन, मग रडू नका.

अधिकारी : आता लगेच पाच टॅंकर मागवतो.

मुख्यमंत्री : तुम्ही जेवढे नियोजन केले आहे, त्यापेक्षा दुप्पट टॅंकर लावा. किती टॅंकर लागणार आहेत, तुम्हाला. ६५ एकर परिसरासाठी किती टॅंकर लागणार आहेत.

अधिकारी : आपण दहा देतो, सर.

मुख्यमंत्री : दहाच टॅंकर का देता, मोजून द्यायला हे काय रेशन दुकान आहे का. पन्नास टॅंकर का तुम्ही मागवले नाहीत. लागू द्या ना सगळीकडे टॅंकर. तुमच्याकडे टॅंकरचा प्राब्लेम आहे का. कोण आहे कॉन्ट्रक्टर. मला अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. पाच टॅंकर नाही, तर पन्नास टॅंकर लावा. लोकांना वापरू द्या भरपूर पाणी. सापसफाई राहू द्या ना. लक्षात ठेवा तुम्ही, मी हलगर्जीपणा खपवून घेणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT