Madha Loksabha News : भाजप खासदार निंबाळकरांनी आमच्या मदतीची जाणीव ठेवली नाही; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाने डागली तोफ

माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर करमाळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलून आणि विविध विकास कामांमध्ये सहभागी करून न घेता कामकाज करत आहेत.
BJP-shivsena Dispute
BJP-shivsena DisputeSarkarnama
Published on
Updated on

Karmala News : माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर करमाळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलून आणि विविध विकास कामांमध्ये सहभागी करून न घेता कामकाज करत आहेत. याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माहिती देणार आहे, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी सांगितले. (BJP MP Nimbalkar not aware of our help : Devanand Bagal)

याबाबत अधिक माहिती देताना शिवसेना (Shivsena) तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी सांगितले की, राज्यात भाजप (BJP) आणि शिवसेनेची सत्ता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) हे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. महाराष्ट्रात इतर मतदारसंघात भाजपचे खासदार मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करत आहेत. मात्र, माढा मतदारसंघात माढ्याचे भाजपचे खासदार हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सांगितलेली कामे न करता दुर्लक्ष करत आहेत.

BJP-shivsena Dispute
Maratha Mandir Sanstha : पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे?, बरोबर ना चंद्रकांतदादा? ; मुख्यमंत्र्यांच्या गुगलीने संभ्रम वाढला

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र या प्रामाणिकपणाची जाणीव त्यांनी ठेवलेली नाही. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला जाणार आहे, असेही बागल यांनी सांगितले.

BJP-shivsena Dispute
KCR Tour In Solapur : केसीआर अन॒ त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ उद्या सोलापूर मुक्कामी; तीन हॉटेल बुक, नव्या घोषणेची शक्यता

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विकास कामांच्या बैठकांना फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलवतात. शिवसेनेच्या कुठल्याच पदाधिकाऱ्यांना ते बोलावत नाहीत. खासदार नाईक निंबाळकर यांना शिवसेनेच्या मतदारांची गरज नाही, असे वाटत आहे, त्यामुळे हे सर्व प्रकार वरिष्ठांच्या कानावर घालणार आहोत, असेही शिवसेनेचे तालुकाप्रमुख बागल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com