Raju Shetti-Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

SugarCane Price Issue : राजू शेट्टींच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा सतेज पाटलांनी सांगितला मार्ग

Satej Patil Advice To CM : माजी खासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून, ती अंतिम टप्प्यात आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदर आणि मागील ऊस हंगामातील उर्वरित ४०० रुपये द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी ऊस वाहतूक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनावर मार्ग निघावा, अशी भावना शेतकऱ्यांसह कारखानदारांची आहे. त्यावर आमदार सतेज पाटील यांनी आज (ता. १४ नोव्हेंबर) मार्ग सांगितला. (Chief Minister should talk to Raju Shetto on the issue of sugarcane price : Satej Patil)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून, ती अंतिम टप्प्यात आहे, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उसाचा हंगाम सुरू होण्यास विलंब होत असल्याने कारखान्याचे नुकसान होत आहे. ऊसतोड मजुरांच्या टोळ्या परत जाण्याच्या मार्गांवर आहेत. टोळ्या परत गेल्या तर कारखानदारांचे चार ते पाच कोटीचं नुकसान होणार होईल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आजच राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करावी, गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेऊन चर्चा करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

राजू शेट्टींचा आरोप चुकीचा : मुश्रीफ

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत ऊस दराच्या आंदोलनावर तोडगा निघेल. पण, पाेलिस बंदोबस्तात जबरदस्तीने ऊसतोड केल्याचा आरोप चुकीचा आहे. जबरदस्तीने ऊस तोडण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT