Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'त्या मृत्यू दाखल्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावायला हवा'

अमित आवारी

अहमदनगर : संसदेत सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी कोविड लसीकरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचा फोटो लावण्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. यावर भाजपचे ( BJP ) खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी केंद्र सरकारच्या बाजूने आपली मते मांडली. यात त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. Chief Minister Uddhav Thackeray's photo should be affixed on those death certificates

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, मला आश्चर्य वाटते की, मागील दोन वर्षात देशात केंद्र सरकारने कोविड विषयक मोठे काम केले आहे. तरीही विरोधक टीका करत आहेत. विरोधकांना नकारात्मक व राजकीय दृष्टीने पाहण्याची सवयच जडली आहे. मी त्यांना सल्ला देईल की ब्लुमबर्गसचा अहवाल पहावा. यात भारताने कोविड लसीकरण मोहिमेत केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. लसीकरण मोहीम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. 1 कोटी 20 लाख लसीकरण सध्या देशात झाले आहे. यात केंद्र सरकार, राज्य सरकारे, आरोग्य यंत्रणा, फ्रंटलाईन वर्कर, सामान्य नागरिक सर्वांचा सहभाग व श्रेय आहे. विरोधक लसीकरण मोहिमेवर शंका उपस्थित करतात म्हणजे ते स्वतः विषयीही शंका उपस्थित केल्या सारखे आहे, अशी खोचक टीका ही त्यांनी केली.

खासदार डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, देशात सध्या ओमिक्रॉन विषाणूच्या नव्या संकटाविषयी चर्चा होत आहे. मात्र ओमिक्रॉनपेक्षा व्हायरल न्यूजचाच जास्त धोकादायक आहेत. लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेतला जात असेल तर राज्यातील घटनांमध्ये मृतांच्या मृत्यू दाखल्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावायला हवा, असे सांगत खासदार विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडाचा उल्लेख न करता राज्य सरकारवर टीका केली.

त्यांनी सांगितले, की ज्या पद्धतीने ओमिक्रॉनवर चर्चा केली जात आहे, त्याबाबत आधी समजून घेतले पाहिजे. कुठलाही व्हायरस आला तर त्याचे म्युटेशन होते. या आधीही अल्फा, डेल्टा असे व्हेरिएंट आले आहेत, ओमिक्रॉन त्यातीलच एक आहे. म्युटेशन का होते आणि तो अतिशय धोकादायक का आहे, यावर दुर्दैवाने कोणाचा अभ्यास नाही. जोपर्यंत जागतिक लसीकरण होत नाही तोपर्यंत असे व्हेरिएंट येतच राहतील. भीती घालण्यासाठी नव्या व्हेरिएंटच्या नावाची चर्चा होते.

कोरोना काळातल्या कामासाठी महाराष्ट्रातील सरकारच्या तिन्ही पक्षांच्या लोकांना भारतरत्न देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही लस सरकारने विकत घेतली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप बुस्टर डोसबाबत काही परवानगी दिली नाही. तरीही केंद्र सरकारवर आरोप केले जात आहेत. या विषयांवर सर्वांनीच अभ्यासपूर्व बोलावे. गुगलमध्ये सर्च करुन भाषण करणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे आहे, असे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT