Eknath Shinde, Nana Patole  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole On CM Shinde : '' मुख्यमंत्र्यांनी भाजपपासून जरा सावधच राहावं...''; पटोलेंचा शिंदेंना सल्ला

सरकारनामा ब्यूरो

विश्वभूषण लिमये -

Solapur : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचीही घोषणा केली आहे. या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंनी सडकून टीका केली होती. त्या टीकेनंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला दिला आहे.

नाना पटोले(Nana Patole) हे शुक्रवारी(दि.२३) सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी भाजपपासून सावध राहावे, त्यांनी असल्या फालतू भानगडीत पडू नये. भाजपविरोधात असलेले सर्व पक्ष पाटण्यामध्ये एकत्रित आले आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे असंही पटोले यावेळी म्हणाले.

पटोले काय म्हणाले ?

मुख्यमंत्र्यांविषयी आता काय बोलावं. आठ दिवसांपूर्वी ते एक नंबरवर असतात. आठ दिवसानंतर दुसऱ्या नंबरवर जातात आणि एक नंबरवर मी पुन्हा येईन हे मुख्यमंत्री होतात. यांचे 50 पैकी केवळ 15 आमदार निवडून येतील असं सर्व्हेमधून समोर येतं. मला असे वाटते की, फार वाईट परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजप(BJP) पासून वाचून राहायला हवं. त्यांनी फालतू या भानगडीत पडू नये असा खोचक सल्लाही पटोलेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला.

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना निशाणा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला होता. शिंदे म्हणाले, विरोधकांच्या अशा चर्चा खूप झाल्या आहेत. २०१४, २०१९ ला देखील सर्व विरोधक मोदींविरोधात एकत्र आले होते. पण त्यावेळीही त्यांच्यात कधी एकमत झालं नाही. आणि आजही एकमत झालेलं पाहायला मिळत नाही असा टोला शिंदेंनी यावेळी लगावला.

पंतप्रधान मोदींचं काम हे सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी नाही. देशाच्या भल्यासाठी काम सुरु आहे. जगभरात आदराचं स्थान निर्माण केलं आहे. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये मोदींना दोनदा भाषण करण्याची संधी मिळाली. G20 सारख्या परिषदेचं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालं असे कौतुकोद्गारही मोदींविषयी काढले.

हे सगळे वैयक्तिक स्वार्थानं बरबटलेली लोकं आहेत. स्वत:ची खुर्ची कशी वाचवायची यासाठी एकत्र आलेले हे लोकं आहेत. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे सर्व लोक एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून मोदींवर टीका करण्यासाठी हे सर्वमंडळी एकत्र आले आहेत. मोदींवर ज्या ज्यावेळी टीका झाली. त्या त्या वेळी जनतेनं मोदींना उचलून धरलं आहे असंही शिंदे म्हणाले.

मोदींना लोकं काय काय म्हणाले होते. कुणी मौत का सौदागर तर कुणी चौकीदार चौर है म्हटलं. पण लोकांनी त्यांचा विरोधी पक्षनेताही होऊ दिला नाही. शेवटी हे सगळं जनता ठरवत असते. आणि जनतेनं ठरवलेलं आहे की, मोदींनीच देशाचे पंतप्रधान राहावं. त्यामुळे विरोधकांनी कितीही ठरवलं, तरी २०२४ मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीनं सरकार स्थापन होईल असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT