Ekanth Shinde, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांचा कराड दौरा रद्द; शंभूराज देसाईंनी सांगितले हे कारण...

Karad Politics यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी कराडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी येणार होते.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

CM Eknath Shinde News : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड (जि. सातारा) येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादनासाठी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री येतात. यंदा मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कऱ्हाडला न येता या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी-सकाळी अभिवादनासाठी येऊन पुणे गाठले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कराड Karad येथील समाधीस्थळी अभिवादनासाठी अपवाद वगळता दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री येथे येतात. ज्येष्ठ नेते चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अभिवादनासाठी मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde हे येणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसा त्यांचा शासकीय दौराही होता; पण अचानक हा दौरा रद्द झाला आहे.

मात्र, त्यांनी यंदा अभिवादनासाठी न येता समाधीकडे पाठच फिरवली. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार हे काल शुक्रवारी रात्रीच कऱ्हाडला मुक्कामी आले. त्यांनी आज शनिवारी सकाळी- सकाळी सात वाजताच काही मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत समाधीस्थळ गाठले. त्यांनी ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सकाळी साडेसात वाजताच ते पुण्यासाठी रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली...

मुख्यमंत्री यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या हेलिकॉप्टरमधून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे कराड विमानतळावर दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री न येण्याचे कारण देत आजारी असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा कराड दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT