Satara Shivsena News : सातारा लोकसभेवर शिवसेनेचाच हक्क; शिंदे गट आग्रही राहणार : पुरुषोत्तम जाधव

Purushottam Jadhav एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला.
Ekanth Shinde, Purushottam Jadhav
Ekanth Shinde, Purushottam Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Satara Shivsena News : सातारा लोकसभा मतदारसंघ हा युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. मागील वेळी खासदार उदयनराजेंसाठी हा मतदारसंघ भाजपला सोडला होता. मात्र, या मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडावा, यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक आग्रही भूमिका घेणार असल्याचे शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

पुरुषोत्तम जाधव यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. जाधव म्हणाले, Eknath Shinde शिंदे गट शिवसेनेची Shivsena जिल्ह्यात तळागाळापर्यंत बांधणी झाली असून, गावागावांत शिवदूत नेमलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविली जाणार आहे. सध्या आम्ही महायुतीत असलो तरी खंडाळा तालुक्याला आजपर्यंत आमदारकी अथवा खासदारकीची संधी मिळालेली नाही.

त्यामुळे हा तालुका मागास राहिला होता. २०१० पासून मी शिवसेनेत काम करत आहे, यापूर्वीदेखील जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे, पण आम्हाला कोणीही निधी दिला नाही. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे आम्हालाही विकासकामे करण्यासाठी निधी मिळत आहे. खंडाळा व वाई तालुक्यातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत तुम्ही आग्रही राहणार का, या प्रश्नावर जाधव म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघातून मी दोन वेळा उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला आला होता. गेल्या निवडणुकीत उदयनराजेंसाठी हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला होता.

Ekanth Shinde, Purushottam Jadhav
Satara Politics : शंभूराज देसाईंना टक्कर देण्यासाठी पाटणकरांचा नवा 'शुगरकेन'चा पर्याय...

आता यावेळेस महायुतीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका होतील. सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडावा, यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक आग्रही भूमिका घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. Maharashtra Political News

युतीच्या जागावाटपात वाई मतदारसंघ जरी राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला तरी तो यावेळेस शिवसेनेला सोडावा, अशी आमची मागणी राहणार आहे. तसे झाल्यास शिंदे गट शिवसेनेने संधी दिल्यास आपण आमदारकी लढण्यास तयार आहोत, असेही पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. मकरंद आबा हे आता युतीमध्ये असल्याने त्यांनी आता खंडाळ्यात जास्त लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Edited By : Umesh Bambare

Ekanth Shinde, Purushottam Jadhav
BJP Party Meeting : ज्यांचे कान टोचायचे त्यांनीच मारली दांडी; भाजपच्या शिबिराकडे पुण्यातील नेत्यांची पाठ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com