Chitra wagh
Chitra wagh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चित्रा वाघ म्हणाल्या, सीआरपीसी व आयपीसीची कलमे फक्त भाजपसाठी आहेत का?

Amit Awari

अहमदनगर : राज्यात भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यावरून भाजपच्या ( BJP ) प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) नेत्यांवर जोरदार टीका केली. Chitra Wagh said, are the clauses of CRPC and IPC only for BJP leaders and workers?

चित्रा वाघ म्हणाल्या, राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेला धरून अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करून झाला. आणखी काही जर मनातली इच्छा बाकी असेल तर ती पूर्ण करा. पण किमान राज्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष द्या. अहमदनगर व पारनेर तालुक्यातील जवळे येथील त्या मुलीच्या खूनातील आरोपी पकडले गेलेले नाहीत.

त्या पुढे म्हणाल्या की, पोलिस राज्य सरकारच्या दावणीला बांधल्यासारखे काम करत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर संदर्भ नसताना गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील पोलिस यंत्रणा एकाच गोष्टीवर अतिशय तत्पर्तेने काम करत आहे, ते म्हणजे भाजपचे नेते व कार्यकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे. परवा सर्वज्ञानी संजय राऊत यांनी लाईव्ह पत्रकार परिषदेत शिवी दिली. लाईव्ह पत्रकार परिषदेच्या आधाराने मुंबई व महाराष्ट्राच्या पोलिसांनी तात्काळ गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे. लाईव्ह पत्रकार परिषदेत जी शिवी दिली गेली, तो पुरावा ग्राह्य धरून राऊतांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे. त्यांच्यासाठी आयपीसीची कलमे संपली आहेत का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

खोटा गुन्हा दाखल केल्यावर काय भोगावे लागते. काय परिस्थितीतून जावे लागते, हे मुंबई पोलिस आयुक्तांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनेवरून फार चांगले माहिती आहे. त्यामुळे त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि नंतरच खोटे गुन्हे दाखल करावेत. सुमन काळे सारख्या प्रकरणात रक्षकच भक्षक झाले आहेत. सीआरपीसी व आयपीसीची कलमे फक्त भाजपच्या नेते व कार्यकऱ्यांसाठी आहेत का? बलात्कारी राज्यात राजरोस फिरत आहेत. संजय राठोडांवर साधी पानभराची फिर्यादही दाखल नाही. मेहबुब शेख जगभर ज्ञान वाटत फिरतोय. नीलेश लंकेवर 353 कलम अजूनही दाखल नाही, अशी किती तरी उदाहरणे सांगता येतील. त्यांच्यासाठी नियम वेगळे व भाजपच्या नेत्यांसाठी नियम वेगळे अशी स्थिती आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT