Tantamukt Samiti Logo Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Tantamukt Samiti : दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडी आजच झाल्या पाहिजेत, असा आग्रह एका गटाने धरला.

Rahul Gadkar

Kolhapur : तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीवरून कोल्हापूर जिल्ह्यात एका गावात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील तंटामुक्त समिती आणि देवस्थान समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी गावसभा बोलावण्यात आली होती. मात्र, ही निवड पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर सभेत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. (Clash between two groups in Kolhapur district over the post of president of Tantamukt Samiti)

गावातील तंटे आणि वाद गावातच सोडविण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गावागावांत तयार करण्यात येते. गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी गावात अध्यक्ष आणि ग्रामदैवत देवस्थान समितीचे अध्यक्ष निवडीसाठी गावसभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत गावातील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. तंटामुक्तीच्या सभेत तंटा झाल्याने मुगळी येथील या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुगळी येथील तंटामुक्त समिती व देवस्थान समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी (ता. १७ नोव्हेंबर) गावसभा बोलावण्यात आली होती. परंतु, दोन दिवसांत गावातील दोन-तीन ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाल्यामुळे गावसभा तहकूब केली. पुढील सभा २८ नोव्हेंबरला घेण्यात येईल, अशी घोषणा सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांनी केली.

दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडी आजच झाल्या पाहिजेत, असा आग्रह एका गटाने धरला. दुसरा गट पुढील सभेत अध्यक्ष निवडीवर ठाम होता. वाढत गेलेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झाले. त्यामुळे गावसभेसाठी जमलेल्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी झाली.

दरम्यान, एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दोन्ही गटांचे प्रमुख आणि समर्थक कोल्हापूर येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात दिवसभर थांबून होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

गावातील सांस्कृतिक सभागृहात पुन्हा गाववसभा भरवण्यात आली, या वेळी देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी एका गटाकडून एक व्यक्तीचे नाव पुढे आले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मंजूर-मंजूर, तर नामंजूर-नामंजूरच्या घोषणा दिल्या. त्यातूनच वाद होऊन तुंबळ झोबाझोंबी व हाणामारी झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT