Mumbai News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. दोन समाजांमध्ये नसलेली भांडणं लावण्याचे पाप ते करत आहेत, त्यामुळे भुजबळ यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. (Remove Chhagan Bhujbal from the Cabinet: Sambhaji Raje's demand)
जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज (ता. १७ नोव्हेंबर) ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना मंत्री भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध दर्शविला. त्यावर संभाजीराजे यांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम छगन भुजबळ करत आहेत. मराठा समाजास सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांमध्ये नसलेली भांडणं लावण्याचं पाप हे भुजबळ करीत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल, तर सरकारचीदेखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे, अशी मागणीही संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
दुसरीकडे मंत्रिमंडळातील सहकारी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भुजबळांच्या भूमिकेबाबत नाराजीची भावना व्यक्त केली. आरक्षणसंदर्भात काही मतं असतील तर ती भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावीत. असे विषय सार्वजनिक स्वरूपात मांडू नयेत. नाही तर आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकारांच्या समोर कॅमेरे लावून घेण्याची आवश्यकता पडेल.
आपलं काही मत असेल तर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्यासंदर्भातील खुलासा पाहिजे असेल तर खुलासा घेतला पाहिजे. असं सार्वजनिकरित्या मत मांडणं हे माझ्यापासून सर्व मंत्र्यांना योग्य नाही, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी भुजबळ यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.