CM In Munawale villege sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट : मुनावळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ

Munawale Project मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मुनावळे पर्यटन स्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

CM Eknath Shinde News : जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी मुनावळे पर्यटन स्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी Satara collector, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्थानिकांनी या सुरू होत असलेल्या पर्यटन स्थळाचा आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा. हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे.

या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणारे पर्यटक यांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र शिंदे म्हणाले, मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राइड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. तसेच यामध्ये सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम या सोयी ही असणार आहेत. maharashtra Political news

ग्रामस्थांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मासेमारीसाठी परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भूसंपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT