CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे दरे गावी दाखल; कोयनेतील जलपर्यटन प्रकल्पाचा आढावा घेणार
CM Eknath Shinde News : कोयना धरणात राबविण्यात येणाऱ्या जलपर्यटन प्रकल्प तसेच बांबू लागवडीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून त्यांच्या दरे तर्फ तांब या मूळ गावी दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde सध्या दरे तर्फ तांब (महाबळेश्वर) या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आले आहेत. सकाळी हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन झाले. जिल्हाधिकारी जितेंंद्र डुडी Satara collector यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी पोलिस अधीक्षक समीर शेख व अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पर्यटनवाढीला खूप मोठी संधी असून, पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. कोयनेच्या ७० कि.मी. च्या बॅक वॉटरमध्ये ऑफिशिअल सिक्रेट ॲक्टमुळे कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्यास बंदी होती.
कोणतेही नैसर्गिक संतुलन न बिघडता त्यात काही शिथिलता आणता येईल का, हे तपासण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानुसार सात किमी बॅक वॉटर आणि दोन किमी बफर झोन वगळता उर्वरित भागात वॉटर स्पोर्ट सुरू करण्यास मंजुरी मिळालेली आहे. Maharashtra Political News
लवकरच त्याबाबत एमटीडीसी आणि जलसंपदा विभागादरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे. बांबू लागवड मिशन आणि कोयना धरणातील वॉटर स्पोर्ट्स या दोन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज त्यांच्या गावी आले आहेत.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.