Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara APMC : समोरासमोर येऊ; पण कुठं आणि कस ते सांगा : शिवेंद्रराजेंनी आव्हान स्वीकारले

Umesh Bambare-Patil

Satara APMC News : मुद्दे नसले की समोरासमोर या, असे आव्‍हान खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale नेहमी देतात. आम्ही समोरासमोर येवू पण कुठं आणि कसं हे मात्र ते सांगत नाहीत, अशी शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी उदयनराजेंची खिल्ली उडवली. तसेच खिंडवाडी येथील बाजार समितीच्‍या जागेच्‍या मुद्यावरच उदयनराजेंनी मनोमिलन तोडल्‍याचा गौप्‍यस्‍फोट देखील त्यांनी केला.

सातारा बाजार समितीच्‍या निवडणूकीत अजिंक्‍य पॅनेलची भूमिका मांडण्‍यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. ते म्‍हणाले, शेतकरी संघटनेच्‍या मुखवट्याआडून उदयनराजे आणि त्‍यांचे समर्थक निवडणूकीला सामोरे जात आहेत. या निवडणूकीत पराभव झाल्‍यानंतर त्‍याचे खापर शेतकरी संघटनेवर फोडून ते मोकळे होतील.

माजी खासदार राजू शेट्टी यांचा आणि स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचा नावलौकिक मातीत मिळवण्‍याचे काम पदाधिकारी करत आहेत. तक्रारी करायच्‍या आणि पैसा मिळवायचा, असा त्‍यांचा धंदा आहे. मुद्दे नसले कि समोरासमोर या, असे आव्‍हान नेहमी खासदार उदयराजे देतात. येवू की समोर पण कुठं आणि कसं हे मात्र ते सांगत नाहीत. त्‍यांचीच री राजू शेळके ओढत आहेत.

समोरासमोर यायला अरे..तु काय सलमान खान, अक्षय कुमार आहेस, अशा शब्‍दात शिवेंद्रसिंहराजेंनी राजू शेळकेंची खिल्‍ली उडवली. खिंडवाडी येथील जागा परत मिळावी, यासाठी कुळांच्‍या आडोशाने उदयनराजेंनीच बाजार समितीला न्‍यायालयात नेले होते. सर्व निकाल आमच्‍या बाजूने लागले आहेत. मनोमिलन असताना ती जागा परत मिळवण्‍यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले.

त्‍या जागी प्‍लॉटिंग पाडून विकण्‍याचा मनसुबा होता. त्‍यास आम्‍ही सहमती न दर्शविल्‍याने मनोमिलन त्‍यांनी मोडल्‍याचा गौप्‍यस्‍फोटही शिवेंद्रसिंहराजेंनी केला. मतदार आमच्‍या विचारांची पाठराखण करत आहेत व करतील. ज्‍या संघटनेच्‍या नावावर निवडणूक लढवली जात आहे, ते स्‍थानिक संघटनावालेच बोगस आहेत. आम्‍हाला गुणीबाळ म्‍हणणाऱ्या उदयनराजेंना मतदारांनी त्‍यांचे गुण ओळखून मार्क देत घरी बसविल्‍याची टीका त्‍यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT