Satara APMC News : सातारा बाजार समिती शेतकऱ्यांच्या मालकीची असून ती कोणी आपली जहागिरी समजू नये. मात्र, या बाजार समितीला व्यापारी आणि भांडवलदारांचा विळखा पडला आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी Shivendraraje Bhosale सहकारातील कोणत्या संस्था शाबूत ठेवल्यात ते सांगावे, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी उपस्थित केला. दरम्यान, शेतकऱ्यांनी द्रोह करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना परिवर्तन करून घरी बसवावे. जर हे तुम्हाला करायचं नसेल तर शेतकऱ्यांनी विष घ्यावे, नाहीतर मग द्रोह करणाऱ्यांनाच विष पाजावे, असे आवाहन त्यांनी केले.
सातारा बाजार समितीबाबत खासदार उदयनराजेंनी जलमंदिर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजू शेळके, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, काही नेते सातारा बाजार समिती ही स्वतःची जहागिरी समजतात. या जहागिरीला व्यापारी, भांडवलदार, दलाल यांचा विळखा पडला आहे.
शेतकऱ्यांना साधा गाळा मिळत नसेल तर काय उपयोग. शिवेंद्रराजे यांनी सहकारातील कोणत्या संस्था शाबूत ठेवल्यात, ते सांगावे. समितीच्या क्षेत्रात दारूची दुकाने सुरू आहेत. प्रत्येकवेळी शिवेंद्रराजे खिंडवाडीतील १७ एकर जागेचा उल्लेख करतात. तत्कालीन आयुक्तांकडे मी ही जागा शेतकऱ्यांसाठी आरक्षित करावी. ती जर राहणार असेल तर ती त्यांना दिली जावी.
मात्र, शेतकऱ्यांच्या नावाखाली या जागेचे व्यापारीकरण होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. आम्ही मेकुड खाऊ नाही. आमच्या दादा महाराजांनी ४२ एकर जागा कचरा डेपोसाठी दिली. त्यावेळी आम्ही पैशाचा विचार केला नाही. आर्थिक संस्था मोडीत काढायच्या आणि त्याचे आर्थिक फायदे हडप करायचे ही त्यांची कामे आहेत. मी मरण पत्करेन पण, आर्थिक गैरव्यवहार करणार नाही.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच आमच्या तत्कालीन बाजार समितीतील संचालकांचे राजीनामे घेऊन मनोमिलन तोडले होते. शिवेंद्रसिंहराजे हिंम्मत असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जरूर गांधी मैदानावर यावे. त्यासाठी राष्ट्रीय दर्जाची पत्रकार परिषद घेऊन एकमेकांना शेजारी बसून प्रश्नांना उत्तरे देऊ, असे खुले आव्हान उदयनराजे यांनी दिले. द्रोह करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी परिवर्तन करून घरी बसवण्याची गरज आहे. जर हे तुम्हाला करायचं नसेल तर शेतकऱ्यांनी विष घ्यावे. नाहीतर मग द्रोह करणाऱ्यांनाच विष पाजावे, असा कडवट सल्ला उदयनराजे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.