Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil News : सतेज पाटलांवर काँग्रेसने दीड महिन्यातच दुसऱ्यांदा सोपवली मोठी जबाबदारी!

Congress News : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसही कामाला लागलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News : काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेसने दीड महिन्यात नव्या दोन जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्य निवडणूक समन्वय समितीची घोषणा केली आहे. या समितीवर सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे दीड महिन्यात सतेज पाटलांवर काँग्रेसने दुसऱ्यांदा मोठी जबाबदारी सोपवली असल्याने कोल्हापूरमध्ये काँग्रेसला अधिक बळ मिळणार आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसही कामाला लागलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केली आहे.

यामध्ये या १७ सदस्यांच्या समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. तर सदस्यांमध्ये विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे.

समन्वय समितीत माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार व प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने ताकद लावलेली असूनही तो मतदारसंघ आमदार सतेज पाटील यांनी पक्षाला एकहाती जिंकून दिला होता. आता सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याने कोल्हापूरमध्ये काँग्रेसला अधिक बळ मिळणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT