Chhagan Bhujbal News : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याचे संकेत आहेत. येथे राज्याचे नेतृत्व करणाऱ्या भुजबळ यांना महाविकास आघाडीचे पॅनेल करण्यात अपयश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच त्यांना आव्हान देत राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप, शिंदे गटाची मदत घेतल्याने स्वतःच्या मतदारसंघातच भुजबळ यांना आव्हान उभे राहिले आहे. (Lasalgaon APMCE election is Chhagan Bhujbal against NCP with Shinde group)
लासलगाव (Nashik) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) श्री. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या पाठींब्याने राष्ट्रवादी, (NCP) भाजप (BJP) आणि शिवसेनेचे (Shivsena) पॅनेल होणार आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी एकत्र येत, भुजबळ विरोधकांची मदत घेत त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय आहे.
स्वतःच्या येवला विधानसभा मतदारसंघातील व आशिया खंडातील सर्वात मोठा कांदा व्यापार असलेल्या या समितीवर गेल्या तीन निवडणुकांत भुजबळ यांची सत्ता होती. यंदा श्री. भुजबळ यांचा आशीर्वाद लाभलेले एक पॅनल त्याचे नेतृत्व माजी सभापती जयदत्त होळकर (राष्ट्रवादी काँग्रेस), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर आणि शिवा सुरवसे (शिवसेना, उद्धव ठाकरे गट), सुरेश बाबा पाटील, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील आणि माजी आमदार कल्याणराव पाटील (भाजप) या नेत्यांनी एकत्र येऊन पॅनेल केले आहे.
त्यांच्या विरोधातील पॅनेलचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे आणि राजेंद्र डोखळे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि भाजपचे डी. के. नाना जगताप यांनी पॅनेल केले आहे. त्यात विद्यमान सभापती सुनिता जगताप यांचा देखील समावेष आहे.
यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ठ्ये म्हणजे मागील पंचवार्षिक निवडणुकीत जे नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून पॅनेल म्हणून मतदारांना सामोरे गेले होते ते यंदाच्या निवडणुकीत परस्परांचे विरोधक आहेत. यामध्ये पॅनेल करताना दोन्हीकडे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आहे.
त्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊ पॅनेल करण्याचे नेत्यांचे संकेत गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते असलेल्या भुजबळ यांच्या मतदारसंघातच महाविकास आघाडीत भाजपने शिरकाव केला आहे.
गत निवडणुकीत श्री. भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब शिरसागर यांचा समावेष असलेले पॅनेल होते. त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्ष पुरस्कृत नानासाहेब पाटील आणि डी. के. नाना जगताप यांनी आव्हान दिले होते. त्या निवडणुकीमध्ये श्री. भुजबळ यांच्या पॅनेलची सत्ता आल्यानंतर दोन्ही गटांनी सभापतीपद अडीच वर्ष देण्याचे ठरले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जयदत्त होळकर यांनी व नंतर नानासाहेब पाटील यांनी सभापती होण्याचे ठरले होते.
प्रत्यक्षात अडीच वर्षे कालावधी संपल्यावर देखील जयदत्त होळकर यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे पंढरीनाथ थोरे गटाने बंडखोरी करीत काही संचालक गटातून बाहेर पडत डी. के. जगताप गटाला येऊन मिळाले. त्यात सभापतीपदी सुवर्णाताई जगताप यांची निवड झाली. त्यामुळे एका गटात व एकाच पक्षात असलेल्या थोरे आणि होळकर यांच्यात राजकीय वितृष्ठ आले.
दरम्यानच्या काळात लासलगाव ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात पारंपारिक विरोधक असलेले होळकर आणि पाटील गट एकत्र आले. त्यांनी विरोधकांवर मात करीत ग्रामपंचायतची सत्ता मिळवली आहे. त्यामुळे याच दरम्यान राज्यात संतांतर झाले. त्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी निवडणूक होईल अशी सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादीचे होळकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बाळासाहेब शिरसागर आणि भाजपाचे नानासाहेब पाटील यांना सोबत घेऊन पॅनल केला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे व भाजपाचे डी के नाना जगताप यांनी स्वतंत्र पॅनल केले. त्यामुळे राज्याचे नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळ यांना घरातुनच राष्ट्रवादीचे थोरे आणि डोखळे यांनी आव्हान दिल्याचे चित्र आहे. त्यातून छगन भुजबळ यांना आव्हान देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि भुजबळांचे परंपरागत विरोधक आमदार सुहास कांदे यांनी या पॅनेलला मदत करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे भुजबळ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.