कोल्हापूर : कोरोना (Covid-19) काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे यामध्ये लाखो लोकांची उपासमार झाली. त्याउलट भारतात तयार झालेली कोरोना प्रतिबंधक लस पाकिस्तानाला मोफत दिली गेली. त्यावेळी यांचे हिंदुत्व कोठे होते?, असा सवाल करत हिंदुच्या जीवावर देशात सत्तेत आलात त्या हिंदुना मरणाच्या दारात सोडले. गंगा सारख्या पवित्र नदीत हिंदुंची प्रेत तरंगताना संपूर्ण जगाने पाहिले, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे होते, अशी जोरदार टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) केली ते आज (ता.10 एप्रिल) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पटोले म्हणाले, देशात तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे होती. तर, देशातील खरेदी क्षमता 83 टक्केने कमी झाली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि मुठभर मित्रांसाठी केंद्र सरकार चालवले जात आहे. हिंदुत्वाच्या नावाने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोल्हापूरमध्ये फडणवीसांकडून आणि भाजपकडून हिंदुना मतदानाचे मशिन करण्याचा प्रयत्न सुरु झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटीलांनी केलेल्या कामाबद्दल टिका करण्यासाठी बाहेरचे लोक आणावे लागले आहेत. तसेच, भाजपला शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यावसायिकांची चिंता नाही, त्यामुळे ते धर्माच्या नावाखाली निवडणूक लढवत आहेत. आम्ही श्रीराम मानतो, आम्हीही हिंदुच आहोत. पण देवांचा वापर निवडणुकीसाठी करत नाही. असा टोलाही पटोलेंनी लगावला.
फडणवीसांच्या सभेतसाठी बाहेरची लोक जमवले...
फडणवीस हे केंद्र सरकारने तरुणांना नोकरी दिली, गरीबी कमी केली, शेतकऱ्यांचे उत्पन्न दिडपट वाढवले, बेरोजगारांचे प्रश्न सोडवले, महागाई आटोक्यात आणली म्हणून सांगितील असे वाटले होते. मात्र, याविषयावर बोलायला त्यांना मुद्दाच नाही त्यामुळे ते हिंदुत्वाचा मुद्दा घेवून कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीत उतरले आहेत. कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराज यांचे गाव आहे. येथे सर्वधर्म समभाव, समतेचा विचार रुजवला जातो. त्याच शहरात जातीयता पेरण्याचे काम केले जात आहे. दरम्यान, फडणवीसांच्या सभेला भाजपला कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील लोक सभेलाही मिळाली नासल्याने त्यांना बाहेरच्या जिल्ह्यातील लोक आणावे लागल्याचा आरोपही पटोलेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.