गिरीशभाऊंनी मला सरकारमध्ये एकट सोडल...

BJP|Shivsena|Mahavikas Aghadi|Girish Mahajan|Gulabrao Patil: शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांना मिस्किल टोला लगावला आहे.
Girish Mahajan - Gulabrao Patil
Girish Mahajan - Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगत आहे. दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची कुणीही संधी सोडत नाही. मात्र, जळगावमध्ये शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. गिरीशभाऊंनी मला सरकारमध्ये एकट सोडल आणि आज रामनवमी निमित्ताने मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी सोबतही घेऊन गेले नाही, असा चिमटा पाटलांनी महाजनांना काढला. ते जळगाव येथे एका शिबिरात बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, (Bharti Pawar) गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील हे उपस्थित होते.

Girish Mahajan - Gulabrao Patil
पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही : परबांचा निर्णय

आज रामनवमी निमित्ताने जळगाव शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.10 एप्रिल) महाजन हे राम दर्शनासाठी राम मंदिरात गेले. नेमके याच मुद्द्यावरून गुलाबराव पाटलांनी महाजनांना टोमणा लगावला. पाटील म्हणाले, आपण सोबत मंदिराच श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार होतो, असे आपले ठरले होते. मात्र, महाजनांनी जसे सरकारमध्ये मला सोडल तसे आज मंदिरात सोबत घेऊन न जाता एकटेच दर्शनाला गेले, असा मिस्किल टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये मात्र एकच हशा पिकला होता.

Girish Mahajan - Gulabrao Patil
राज्यात राष्ट्रपती राजवट ही भाजपची अधिकृत मागणी नाही : फडणवीसांनी केलं स्पष्ट

दरम्यान, राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यामध्ये रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना, जळगावात मंत्री गुलाबाराव पाटील आणि महाजन यांच्यात खेळीमाळीचे वातावरण जळगावासीयांना बघायला मिळाले आहे. सुमारे 25 वर्ष युतीत सोबत काढलेल्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचे आजही जिव्हाळ्याचे संबध आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून युती तुटल्याने या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये दुरावा बघायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com