Ashish Shelar, Satej Patil
Ashish Shelar, Satej Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आशिष शेलार कोल्हापूरात गेले आणि अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन आले...

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजित भाजप (Bjp) उमेदवाराच्या प्रचार सभेत आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी कोरोनाच्या काळामध्ये 35 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करतो. शेलार हे अत्यंत अभ्यासू नेते असून कोणाच्यातरी सांगण्यावरून त्यांनी अशा पद्धतीने चुकीचे विधान करणे अपेक्षित नव्हते. दोन दिवसांमध्ये त्यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, अशा इशारा काँग्रेस (Congress) नेते पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली.

सतेज पाटील म्हणाले, मी गेली दोन दशके सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. आजपर्यंत केवळ लोकांच्या हिताचा विचार करत विकासाचे राजकारण केले. कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरीकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्तरावर कमिट्या स्थापन करुन लोकांना दिलासा दिला. लसीकरणासाठी जनजागृती केली. कोल्हापूर जिल्हा लसीकरणाच्या टक्केवारीत आघाडीवर ठेवला. मिशन वायू उपक्रमांतर्गत कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये जिल्ह्यामध्ये 500 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटरची बँक स्थापन केली. तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सीपीआर हॉस्पीटल, आयजीएम इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय तसेच गांधीनगर, आजरा, राधानगरी, मलकापूर, मुरगूड, कोडोली, आसुर्ले-पोर्ले व आयसोलेशन हॉस्पीटल, असे एकूण 15 पीएसए प्लँट आणि 8 एलएमओ प्लँट जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कार्यान्वित केले.

विरोधांकडे प्रचारासाठी मुद्दे नसल्या कारणाने अत्यंत खालच्या पातळीला जाऊन वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचे काम चालू आहे. भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक महिलांबद्दल अपशब्द वापरतात, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामान्य नागरिकांच्या मागे ईडी लावण्याची भाषा करतात, ही सगळी वक्तव्ये म्हणजे त्यांना आपला पराभव दिसत असल्याचे द्योतक आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.

आजपर्यंत सामान्य माणसांचा विचार करून मी पारदर्शी, प्रामाणिक काम करीत आलेलो आहे. हे संपूर्ण जिल्हा जाणतो. छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी असून त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT