Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : हक्कभंगाचा इशारा देणाऱ्या आमदारांना सतेज पाटलांनी विचारला जाब

Satej Patil Kolhapur road : 100 कोटी कुठे गेले याची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कारवाई करा, सतेज पाटील यांनी चांगलेच सुनावले.

Rahul Gadkar

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली असल्याचे सांगत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली होती. येत्या सात दिवसात कोल्हापुरातील रस्त्यांबाबत रिझल्ट द्या अन्यथा हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी क्षीरसागरांनी दिला होता.

त्यावर विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्यांची झालेली वाताहात बघा. त्याची पाहणी करा, कारवाई करावी अशी मागणी करत सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर आणि दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांना चांगलेच सुनावले आहे.

ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे झाली आहेत त्यांची तपासणी करा आणि पंधरा दिवसात अहवाल मागवा. 100 कोटी कुठे गेले याची तपासणी करणे गरजेचे आहे. सत्तेतील दोन्ही आमदारांना माझ आवाहन आहे. की, या कामासंदर्भात कारवाई करावी, असेही सतेज पाटील म्हणाले.

'केवळ हक्कभंग आणतो म्हणणे याला काही अर्थ नाही. हकभंग कधीही आणता येतो त्याला अधिवेशनाची किंवा मंत्रिमंडळाची गरज नाही तो आताही पाठवता येतो. हक्कभंगाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट असायला हवी.

मी कशासाठी हक्क भंग आणतोय हे देखील स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. कोणत्या टेंडर साठी कोणत्या अधिकाऱ्याला फोन जातो अधिकारी कुणाच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात हे सर्व आम्हाला माहिती असतं', असेही आमदार पाटील म्हणाले.

दरम्यान फुलेवाडी येथे स्लॅब दुर्घटना प्रकरणावर बोलताना सतेज पाटील यांनी, या कामाची चौकशी झाली पाहिजे. त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. कामाचे पहिल्या टप्प्यातील बिल अदा झाले असेल तर तेही का दिले? कोणाच्या स्वाक्षरीने दिले. त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT