महायुती सरकारने मराठा समाजासाठी आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला.
ओबीसींसाठी सरकारने उपसमितीची स्थापना केली.
विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत फडणवीसांवर चाणाक्ष आणि चलाख असा आरोप केला.
त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला खेळवलं जात असल्याचं वक्तव्य केलं.
या बैठकीला विश्वजित कदम, सतेज पाटील आणि विशाल पाटील हे नेतेही उपस्थित होते.
Sangli News : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरू न पुन्हा एकदा दोन समाज आमने-सामने आले होते. पण राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजासाठी निर्णय घेत शासन निर्णय काढला. यानिर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला होता. ज्यानंतर सरकारने ओबीसींसाठी उपसमितीची घोषणा केली. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी, राज्याचे मुख्यमंत्री फार चतुर व चाणाक्ष आहेत. त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला पद्धतशीरपणे खेळवण्याचे काम केले असा हल्लाबोल केला आहे. ते सांगलीतील वांगी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, सतेज पाटील, खासदार विशाल पाटील आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेत चलो मुंबईचा नारा दिला होता. त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण पुकारले. त्यांचे पाचव्या दिवसी 8 पैकी 6 मागण्या राज्यातील महायुती सरकारने मान्य केल्यानंतर उपोषण थांबले. ज्यानंतर त्यांनी मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले. हे आंदोलन संपत नाही तोच मराठ्या शासन निर्णयावरून ओबीसी समाज आक्रमक झाला. यानंतर राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी उपसमितीची घोषणा केली. त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक देखील केली. यानंतर महायुतीचे नेते छगन भुजबळ यांचे राजकीय महत्व कमी करत असल्याची टीका सुरू झाली होती.
अशातच वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री फार चतुर व चाणाक्ष आहेत. त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला पद्धतशीरपणे खेळवण्याचे काम केले आहे. जीआर काढला; पण त्याचा अर्थ काही लागत नाही. ओबीसींना काय दिले आणि मराठ्यांना काय दिले, हे काहीच समजत नाही. एकीकडे हसल्यासारखं करायचं दुसरीकडे रडल्यासारखं करायचं, असं स्क्रिप्टेड नाटक सरकार चालवत आहे. शेवटी मात्र सर्वांच्या तोंडाला पाने पुसली जातील, अशी टीका वडेट्टीवार त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.
तसेच करमाळ्यात अवैध मुरूम उत्खननप्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. महिला IPS अंजली कृष्णा या अधिकाऱ्याला अजितदादा यांनी धमकी दिल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. त्याच मुद्द्यावर थेट बोट ठेवत, सत्ता सेवेसाठी आहे, दादागिरीसाठी नाही; पण महायुती सरकारला सत्ता मालकी हक्काने मिळाल्यासारखी वाटत आहे. अधिकाऱ्यांना धमकावणे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. सत्तेचा माज एवढा ओसंडून वाहतोय की, उपमुख्यमंत्री स्वतःला कायद्यापेक्षा वरचढ समजू लागल्याचा टोला वडेट्टीवार त्यांनी अजितदादांना लगावला आहे.
मंत्री विखे-पाटील यांच्या भूमिकेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, उद्या काही अंगलट आलं, तर जबाबदारी माझ्यावर येऊ नये, म्हणून त्यांनी स्वतःवरून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न 1: वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर काय आरोप केला?
➡️ त्यांनी फडणवीस चतुर व चाणाक्ष असून मराठा आणि ओबीसी समाजाला खेळवले, असा आरोप केला.
प्रश्न 2: हा वक्तव्य कुठे करण्यात आला?
➡️ सांगलीतील वांगी येथे पत्रकार परिषदेत.
प्रश्न 3: या बैठकीला कोणते नेते उपस्थित होते?
➡️ आमदार विश्वजित कदम, सतेज पाटील आणि खासदार विशाल पाटील उपस्थित होते.
प्रश्न 4: ओबीसींसाठी सरकारने काय निर्णय घेतला?
➡️ ओबीसींसाठी उपसमिती स्थापन केली.
प्रश्न 5: या वादाचा राजकारणावर काय परिणाम होईल?
➡️ काँग्रेस-भाजप संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.