Kolhapur News : काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजप नेत्यांच्या भेटीचे सत्र सुरूच ठेवले आहे. गोकुळ निवडणुकीच्या प्रचारानिमित्त भाजपचे नेते आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या चंदगडमधील इनाम सावर्डे येथील राहत्या घरी भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले. काही दिवसांपूर्वी शिवाजीराव पाटील यांनी आमदार सतेज पाटील हे लांबचे नाहीत, असे विधान केले होते. त्यानंतर झालेल्या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरण नव्याने जुळणार का? अशी चर्चा आहे.
आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मनात गोकुळच्या सद्यस्थितीबद्दल आणि महायुतीच्या अंतर्गत कारभाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून मोठी खदखद आणि नाराजी असल्याचे बोलले जात आहे. सतेज पाटील यांनी महायुतीमधील याच अंतर्गत मतभेदांचा आणि नाराजीचा अचूक वेध घेत ही राजकीय खेळी खेळली आहे.
गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा हा परिसर गोकुळच्या निवडणुकीत नेहमीच निर्णायक मानला गेल्यामुळे या भागातील ठरावधारकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सतेज पाटलांनी थेट आमदारांच्या घरातच ही राजकीय फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गोकुळच्या राजकारणामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष मध्यंतरी उफाळून आला होता. शिवाय, गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या महायुतीच्या बैठकीत आमदार शिवाजी पाटील यांना निमंत्रण दिले नसल्याने त्यांनी आपली खदखद व्यक्त करून दाखवली होती.
त्यानंतर बोलताना, जर महायुतीचे नेते आपल्याला बेदखल करत असतील तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे आम्हाला लांबचे नाहीत, असे विधान करून नव्या राजकीय समीकरणाचे संकेत आमदार पाटील यांनी दिले होते.
या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय खल सुरू झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.