Satej Patil On CM Fadnavis : 'देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचा धसका घेतला...', सतेज पाटलांचा टोला; 'छात्रों की गुंज' तटस्थ व्यासपीठ!

Rahul Gandhi Chhatro Ki Goonj : राहुल गांधी हे पुण्यात'छात्रों की गुंज'मधून विद्यार्थींनींशी संवाद साधणार आहेत. त्याबाबत CM देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस महाविद्यालयातील विद्यार्थींशी संवाद साधत आहेत, असे म्हणत टीका केली होती. त्याला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे
Satej Patil  Rahul Gandhi CM Fadnavis
Satej Patil Rahul Gandhi CM Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Satej Patil News : शनिवारी राहुल गांधी 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाच्या माध्यमातून पुण्यात विद्यार्थींशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस म्हणाले की, 'माझ्याकडे जी माहिती आहे त्या प्रमाणे काँग्रेस नेत्यांच्याद्वारे संचालित जी महाविद्यालय आहेत त्यातल्याच मुलींचे रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं, अशा पद्धतीचे आदेश आहेत.'

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी समाचार घेतला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, 'मला वाटतंय मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतलीये हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय. 'छात्रो की गुंज' राहुल गांधी कार्यक्रम घेत आहेत, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीशी संवाद साधत आहेत, कोटापासून हा कार्यक्रम सुरू झाला. हजारो युवत युवतींना राहुल गांधी आशेचा किरण दिसत आहे. हे सिद्ध झाले आहे.'

'ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. फ्री टू ऑल असा हा कार्यक्रम आहे. याचं महाराष्ट्रात कॅम्पेनिंग याचं जोरात झालं आहे. कदाचित या धास्तीपोटी त्यांचं हे वक्तव्य असेल.', असा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांना सतेज पाटलांनी लगावला.

Satej Patil  Rahul Gandhi CM Fadnavis
Congress news : काँग्रेसमधील बड्या नेत्याच्या लेकीचे पक्षाच्याच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; आईच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच उडवून दिली खळबळ

प्रधानांच्या राजीनाम्याचे त्यांना दु:ख

पुढे बोलताना ते म्हणाले, 'मुळात काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही बॅनर त्या व्यासपीठावर लावले नाही. राहुलजींच्या माध्यमातून तटस्थ व्यासपीठ आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत. नीट मुद्दा देशात पहिल्यांदा कोणी मांडला असेल तर तो राहुलजींनी मांडला.'

'150 पेपर लीक देशात लीक झाले,हा मुद्दा राहुलजींना मांडला. राहुलजींनी तरुणाईचा विषय हातात घेतला आहे. ते त्यांना कुठंतरी खुपतंय आणि त्यांच्या आंदोलनामुळे धमेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला, पहिली विकेट या सरकारची १२ वर्षात पहिल्यांदा पडली याचं दुःख त्या मंडळींना आहे.' असे ते म्हणाले.

Satej Patil  Rahul Gandhi CM Fadnavis
Rahul Gandhi News : प्रयागराजमधून राहुल गांधींचा थेट हल्लाबोल; म्हणाले,'विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढाई ...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com