Satej Patil: "मला चेअरमन व्हायचं नाही, माझा घरचा उमेदवारही नाही, फक्त गोकुळ वाचवायचंय"'; सतेज पाटलांचं इमोशनल कार्ड

Satej Patil, Gokul Election, Kolhapur News: गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांनी गोकुळ वाचवण्याचे आवाहन करत, स्वतःला कोणतेही पद नको असून शेतकरी आणि दूध उत्पादकांचे हितच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
Satej Patil criticizes Mahadevrao Mahadik from tanker in Gokul
Satej Patil criticizes Mahadevrao Mahadik from tanker in GokulSarkarnama
Published on
Updated on

Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल करण्यात आले. काँग्रेसकडून आत्तापर्यंत ९७९ ठराव दाखल करण्यात आले असून आणखीन जवळपास ८०० पेक्षा अधिक ठराव गोळा होणार आहेत. सध्या महायुती एकत्र निवडणूक लढवत असली तरी निकालानंतर बॉम्ब फुटणार आहे. असा धक्कादायक दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, गोकुळची रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन मागील निवडणूक लढवली, चांगला कारभार केला. दूध दरवाढ दिली. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. आमचा दूध उत्पादक हा आमचा केंद्र बिंदू आहे. खर्च कमी आणि चार पैसे शेतकऱ्याला मिळेल,असा कारभार केला.

Satej Patil criticizes Mahadevrao Mahadik from tanker in Gokul
Kolhapur : 'गोकुळ'वर कब्जासाठी मुश्रीफांचा गुरुवारी 'पॉवर शो' : शिवसेना, भाजपही एकाचवेळी दाखवणार ताकद; सतेज पाटलांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन

आज उलट्या बाजूला असलेले लोक सरकार विरोधी बोलत नाहीत, आमचे निर्णय कोल्हापुरात घेतो मुंबईत नाही. गोकुळला मल्टिस्टेस्ट करू नका. गोकुळ जर मल्टिस्टेस्ट झाला तर शेतकऱ्याची गोकुळ वरील मालकी जाईल. आम्ही कोणत्याही संस्थेवर हरकत घेतली नाही, आमचा पाया हा दूध संस्था आहे. आताची लढाई ही गोकुळ आणि गावोगावी असणाऱ्या संस्था टिकवण्यासाठी आहे.

ज्या घराने गोकुळला आपले आयुष्य दिले. त्यांना कुटुंबातील व्यक्तील आपण अध्यक्ष करणार होतो. पण त्यांना विरोध झाला, आता त्याच चुयेकर घराण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. राज्यात जे सत्तेत आहेत ते मुक्याने मार सहन करत आहे, ते जनतेच्या प्रश्नावर बोलत नाहीत.

आमचे ठराव हे गोकुळ वाचवण्यासाठी आहे. एकाबाजूला महायुतीची, पैशाची सत्ता तर दुसऱ्या बाजूला १४ रुपये दर देणारा सतेज पाटील आहे. निकाल लागल्यानंतर सायलेंट बॉम्ब फुटणार आहे. कारण पलीकडे उमेदवारीवरून खदखद आणि शक्ती प्रदर्शन सुरू आहे. मोठा भाऊ लहान भाऊ हा वाद सुरूच आहे, ते मिटत नाही. ते वाद देवाभाऊ मिटवणार आहे. ४५७१ एवढे मतदार सध्या तरी पात्र आहेत.आतापर्यंत ९७९ ठराव दाखल झाले आहेत. उद्या पर्यंत आणखी ८७२ ठराव दाखल होतील, तर एकूण १८५१ ठराव सध्या आहेत.

Satej Patil criticizes Mahadevrao Mahadik from tanker in Gokul
Gokul Election: गोकुळच्या राजकारणात कुपेकरांचा 'डबल गेम' : बहीण मुश्रीफांच्या पाठीशी, भाऊ सतेज पाटलांच्या गळाला

महायुतीतील सर्वांचा आकडा जो जाहीर केला तो ५०४७ आहे, मात्र अधिकृत पात्र ठराव धारक आकडा हा ४५७१ आहेत. मला गोकुळचा चेअरमन व्हायचे नाही मला काही टँकर नको, पण माझी लढाई ही गोकुळ वाचवण्यासाठी आहे. माझा घरचा उमेदवार कोणी नाही. पुढील २ महिने दक्ष रहा, कोणी तरी दारातून, खिडकीतून येईल, दारात स्टिकर लाऊन ठेवा. गोकुळ टिकवायचं असेल तर आपल्या आघाडीचा विजय झाला पाहिजे. असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com