Congress leader Naresh Desai, a long-time associate of former CM Prithviraj Chavan, announced his resignation, signaling growing dissent within the party’s Satara district unit. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Congress : काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बदलूनही सूर जुळेना..., माजी मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेल्या बड्या नेत्याचा रामराम

Naresh Desai Resigns : जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी शुक्रवारी (24) जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्याकडे पाठवले आहे.

सरकारनामा ब्युरो

Satara News, 25 Oct : जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी शुक्रवारी (24) जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्याकडे पाठवले आहे.

वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात यामागे राजकीय कारण असल्याचीही चर्चा आहे. लवकरच ते पुढचा राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्‍यांच्यासोबत पाटण तालुक्यातील काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्तेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्‍हाध्‍यक्ष म्‍हणून रणजितसिंह देशमुख यांच्‍याकडे काँग्रेसची जबाबदारी दिल्यानंतर त्‍यांनी जिल्ह्यात पुन्हा पक्ष सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. पण काही करणास्तव जुन्या-नव्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यातूनच काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी आज आपल्या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देशमुख यांच्याकडे दिला आहे.

त्यांच्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले असले, तरी त्यामागे राजकीय कारण दडल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. आता जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख हा राजीनामा स्वीकारणार का? याची उत्सुकता आहे.

देसाई यांच्यासोबत पाटण तालुका काँग्रेसचे काही पदाधिकारी, तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या राजीनाम्याबाबत बोलताना नरेश देसाई म्हणाले, गेली 25 वर्षे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाबरोबर प्रामाणिकपणे काम केले.

परंतु सध्‍या पक्षात काम करत असताना काहींना माझी अडचण होत होती. ती अडचण दूर करण्‍यासाठी आपणच बाजूला झालेलं बरं. पक्षातून बाजूला होताना अतीव दुःख होत आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा वैयक्तिक कोणाची मने दुखावली गेली असतील तर त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT