Karad Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीने रिप्लाय दिला नाही..., अख्खा पक्षच भाजपच्या गळाला, प्रवेशाचा मुहूर्तही ठरला

Karad Municipal Political Equation : कराड पालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, माजी नगराध्यक्ष दिवंगत जयवंतराव जाधव यांचे पुत्र आशुतोष जाधव यांच्यासह जनशक्तीचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Atul Bhosale,  Atul Bhosale
Janashakti leader Arun Jadhav, along with former corporators, joins BJP in Mumbai under the guidance of MLA Atul Bhosale marking a major shift in Karad politics.Sarkarnama
Published on
Updated on

Karad News, 25 Oct : कराड पालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, माजी नगराध्यक्ष दिवंगत जयवंतराव जाधव यांचे पुत्र आशुतोष जाधव यांच्यासह जनशक्तीचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकारातून मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.

या पक्षप्रवेशानंतर पालिका निवडणूक रिंगणातील राजकीय संदर्भ वेगाने बदलण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, पक्ष कोणता यापेक्षा शहराचे हित, विकास महत्त्वाचा आहे. भाजपप्रवेशासाठी आपली कुठलीही अट नाही, अशी प्रतिक्रिया अरुण जाधव यांनी दिली आहे.

राजकीय गणिते बदलणार

जनशक्तीतील जाधव गटाची भाजपशी जवळीकता वाढल्याने कऱ्हाड पालिकेच्या वर्तुळातील राजकारण गतीने बदलणार आहेत. ऐन दिवाळीत राजकीय वातावरणाला कलाटणी मिळाली. दिवाळीच्या शुभेच्छांच्या निमित्ताने जनशक्तीच्या गटासोबत भाजप नेत्यांची बैठक झाली. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेत तेथे केलेली बॅटिंग परिणामकारक ठरली.

पुढच्याच दिवशी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी जाधव कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलेल्या शुभेच्छाचींही शहरात चर्चा झाली. त्यानंतर जाधव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला गती आली. त्यामुळे भाजपने शहरातील राजकीय उलाढाल गृहीत धरून केलेली आखणी अधिक परिणामकारक ठरताना दिसली.

चार जागांसह नगराध्यक्षपदावर चर्चा

अरुण जाधव यांनी भाजपसोबत २ प्रभागांसह नगराध्यक्षपदावर प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे. कऱ्हाडचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने त्या जागेवर जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव किंवा आशुतोष जाधव यांना संधी मिळू शकते. दोघांचाही लोकसंग्रह चांगला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाने मोठ्या घडामोडी शक्य आहेत.

Atul Bhosale,  Atul Bhosale
Tarale ZP election : भावाला पाडणाऱ्यांनाही शंभुराज देसाईंनी शिवसेनेत आणलं..., पाटणकर अन् भाजपला पंचायत समिती राखणं चॅलेंजिंग

राष्ट्रवादीने रिप्लाय दिला नाही

जाधव गटासाठी आमदार डॉ. भोसले यांनी आखलेल्या खेळीने भाजपची मोट घट्ट होणार आहे. जनशक्ती आघाडीचा भाजप प्रवेश काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही धक्का आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी त्यांची पहिली बोलणी झाली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजप प्रवेश निश्चित केला.

काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का

कराड नगरपालिकेच्या 2001 मधील सार्वत्रिक निवडणुकीत जनशक्ती आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर जाधव गट सत्तेत आला. तेव्हापासून जाधव गट पालिकेच्या राजकारणात सक्रिय आहे. आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी 2004 मध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आघाडीच्या ताकदीवर निवडणूक देखील लढवली. त्यावेळी त्यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला.

Atul Bhosale,  Atul Bhosale
Karad NCP Politics : राष्ट्रवादीच्या खासदारांच्या कराड दौऱ्याचे दक्षिण अन् उत्तरेत हादरे : अजितदादा बदलणार तालुक्याचं राजकीय चित्र

मतदारसंघ पुनर्रचनेत कऱ्हाड शहराचा समावेश कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झाला. त्या वेळी 2009 मध्ये ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांना जनशक्तीने साथ दिली. त्यानंतर 2014, 2019 व 2024च्या विधानसभेत जनशक्तीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादी म्हणजेच, महाविकास आघाडीचाच प्रचार केला.

आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह महाविकास आघाडीशीही अरुण जाधव यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे जाधव गटाचा भाजप प्रवेश महाविकास आघाडीसह काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का मानला जात आहे. पण निकालानंतरच हा धक्का किती मोठा होता? जाधव यांच्या प्रवेशाचा भाजपला काय फायदा झाला? गोष्टी कळणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com