Karad NCP Politics : राष्ट्रवादीच्या खासदारांच्या कराड दौऱ्याचे दक्षिण अन् उत्तरेत हादरे : अजितदादा बदलणार तालुक्याचं राजकीय चित्र

Ajit Pawar Karad Visit : सातारा जिल्हा परिषद, 11 पंचायत समिती, नऊ नगरपालिकांसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. यावेळच्या स्थानिकच्या निवडणुकीच्या निमित्ताने कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. कऱ्हाड दक्षिणमध्ये उंडाळकर गटासह राष्ट्रवादीत आल्याने तालुक्यात पहिल्यांदाच या पक्षाला त्यांच्या गटाची ताकद मिळाली आहे.
Ajit Pawr,  MP Nitin Patil,  Udaysinh Patil Undalkar
Deputy CM Ajit Pawar with NCP leaders during Karad visit - the event marks a major political realignment in Karad South and North ahead of local elections.Sarkarnama
Published on
Updated on

Karad News, 25 Oct : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात भाजपपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही काँग्रेसचे स्थानिक नेते आपल्‍याकडे घेण्याचा सपाटाच लावला आहे. दक्षिणमधील काँग्रेसचे स्थानिक नेते पैलवान नानासाहेब पाटील यांनी नुकताच खासदार नितीन पाटील यांचा पाहुणचार केला.

यात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी पक्ष प्रवेशासंदर्भात पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्याचे समजते. दरम्यान, रविवारी (ता.26) उपमुख्यमंत्री पवार, मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत कऱ्हाड दक्षिण व उत्तरमधील अनेकांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध राजकीय पक्षांकडून कशा प्रकारे लढवायच्‍या, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाचाही धडाका लावला आहे.

त्याचबरोबर पक्षीय पातळीवर चाचपणीही सुरू केली आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीची आरक्षण सोडत झाली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांकडे आरक्षणानुसार निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या इच्छुकांवर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसली, तरी इच्छुकांनीही आता पायाला भिंगरी लावून फिरण्याचा श्रीगणेशा केला आहे.

सातारा जिल्हा परिषद, 11 पंचायत समिती, नऊ नगरपालिकांसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे दिसत आहेत.

कऱ्हाड दक्षिणमध्ये अॅड. उंडाळकर गटासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने तालुक्यात पहिल्यांदाच या पक्षाला त्यांच्या गटाची ताकद मिळाली आहे. यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचा प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ajit Pawr,  MP Nitin Patil,  Udaysinh Patil Undalkar
Tarale ZP election : भावाला पाडणाऱ्यांनाही शंभुराज देसाईंनी शिवसेनेत आणलं..., पाटणकर अन् भाजपला पंचायत समिती राखणं चॅलेंजिंग

भाजप नेत्यांच्या हॉटेलमध्ये पाहुणचार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मध्यंतरी काँग्रेसचे नरेंद्र नांगरे पाटील यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काल खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांचा पाहुणचार नांगरे-पाटील यांच्या हॉटेलमध्ये करण्यात आला. त्या वेळी पैलवान नानासाहेब पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान नांगरे पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार की काय याबाबत उलट-उलट चर्चा सध्या सुरू आहे.

Ajit Pawr,  MP Nitin Patil,  Udaysinh Patil Undalkar
Mayani ZP Election 2025 : सख्खा भाऊच राष्ट्रवादीच्या सुरेंद्र गुदगेंचा अश्वमेध रोखणार? 'बिभीषण' तयार करण्यासाठी विरोधकांचे तगडे प्रयत्न

थोरात, जगतापही राष्ट्रवादीत?

पैलवान नानासाहेब पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पाटील यांचे स्वागत करून बराच वेळ चर्चा केली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी पक्ष प्रवेशासंदर्भात पैलवान पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे, तर माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केलेले आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शेतीमित्र अशोकराव थोरात, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बंडानाना जगताप यांनाही गळ घालण्यात आल्याचे समजते. त्याच्या प्रवेशासंदर्भातील निर्णय लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तरेतीलही अनेकांचा रविवारी प्रवेश

कऱ्हाड उत्तरमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे गट कार्यरत आहेत. त्या गटातीलही अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्‍प्‍यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात.

मसूर गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब चोरेकर यांचे पुतणे बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चोरेकर यांच्यासह अनेक जणांशी चर्चा झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यांचाही उपमुख्यमंत्री पवार, मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

घोगावला ट्रेलर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी कऱ्हाड दक्षिणमधील घोगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचा सोहळा शनिवारी (25 ऑक्टोबर) दुपारी चार वाजता आमदार अमोल मिटकरी, खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. मोहनराव नायकवडी यांच्यासह अन्य काही जण त्यावेळी पक्षप्रवेश करतील. त्या वेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई, महिला जिल्हाध्यक्षा सीमा जाधव आदी उपस्थित राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com