Congress Andolan
Congress Andolan  Pramod Ingale, satara
पश्चिम महाराष्ट्र

Satara : काँग्रेसने मारले मंत्री लोढांच्या प्रतिमेस जोडे

Umesh Bambare-Patil

सातारा : शिवप्रताप दिनी प्रतापगडावर पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली होती. त्याच्या निषेर्धात काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवना मंत्री लोढा यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आला.

प्रतापगडावर बुधवारी शिवप्रताप दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी बोलताना पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन केलेल्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली होती.

यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच सर्वच स्तरातून निषेध झाला. आज जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री लोढा यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

यावेळी मुर्दाबाद मुर्दाबाद मंगल प्रसाद लोढा मुर्दाबाद, मोदी हटाव देश बचाव, जय भवानी जय शिवाजी... अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरचिटणीस नरेश देसाई, ॲड. दत्तात्रय धनवडे, मनोज देसाई, कल्याण पिसाळ, अन्वर पाशा खान, रजनी पवार, धनश्री महाडिक, सुषमा राजेमहाडिक, मनीषा पाटील, अरबाज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT