Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Congress Protest : काँग्रेसचं टोल बंद आंदोलन; आधी महामार्गाची दुरुस्ती, नंतर टोल वसुली...

Congress Movement Satara-Karad Toll Plaza : आधी महामार्गाची दुरुस्ती कर आणि मगच टोल वसुल करा, अशा घोषणा देत सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाक्यावर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात आले.

Umesh Bambare-Patil

Satara News 03 August : आधी महामार्गाची दुरुस्ती कर आणि मगच टोल वसुल करा, अशा घोषणा देत सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाक्यावर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी सातारा, सांगली जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी दिलेल्या पर्यायी रस्त्यांवर चिखल झाल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

यामुळे छोटे मोठे अपघातही होत आहेत. या सर्व समस्या असतानाही कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील टोलनाक्यावर टोल वसुली सुरु आहे. त्यामुळे 'आधी सुविधा द्या मगच टोल वसुल करा,' अशी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्यावतीने (Congress) आज तीन जिल्ह्यातील टोल नाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात आले.

सातारा आणि कराड मधील तासवडे व आनेवाडी टोलनाक्यावर काँग्रेसने आंदोलन केले. तासवडे टोलनाक्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) तसेच आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली.

तसेच महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा मगच टोल वसुली करा, अशी भूमिका घेतली. अनेक वाहने विना टोल देताच सोडण्यात आली. यावेळी मोठ्याप्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. महामार्गाची दुरवस्था असताना टोल वसुली केली जात आहे. जोपर्यंत महामार्गाची दुरुस्ती होत नाही, सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत टोल वसुली बंद करावी. अन्यथा काँग्रेसच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या (Pune-Kolhapur National Highway) सहा पदरीकरणाचे काम सुरु असून यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. मोठंमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रवासाला दुप्पट वेळ लागत आहे. हे काम सबकॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे कामाचा दर्जा घसरला आहे. या परिस्थितीत पूर्ण टोल आकारणे हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT