Eknath Shinde And Sharad Pawar Meeting : महाराष्ट्रातली सर्वात मोठी घडामोड, पंधरा दिवसांच्या आतच शरद पवार अन् CM शिंदेंची दुसऱ्यांदा भेट

Maharashtra Politics : एकीकडे राज्यातलं वातावरण मराठा, ओबीसी आरक्षण, शेतकरी वर्गाच्या समस्यांसह इतर मुद्द्यांवरुन तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा भेट घेतली आहे.
Eknath Shinde - Sharad Pawar.jpg
Eknath Shinde - Sharad Pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत.त्यामुळे भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.यातच राजकीय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) शनिवारी ( ता.3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहेत. शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे. पंधरा दिवसांच्या आतच ही या दोन दिग्गज नेत्यांची दुसर्यांदा भेट आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एकीकडे राज्यातलं वातावरण मराठा, ओबीसी आरक्षण, शेतकरी वर्गाच्या समस्यांसह इतर मुद्द्यांवरुन तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पुन्हा एकदा भेट घेतली आहे.या आधी या दोन्ही नेत्यांची 22 जुलैला भेट झाली होती.

गेल्या भेटीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासह इतर प्रश्नांवर चर्चा झाली होती. आताच्या भेटीत विरोधकांच्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना सरकारकडून डावलण्यात आल्याचा मुद्दा, पाणी प्रश्न,निधी यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde - Sharad Pawar.jpg
Sushma Andhare : मोठी बातमी! पवारसाहेबांच्या 2 मतदारसंघासह कोथरूडवर शिवसेनेचा दावा; भरसभेत अंधारेंची मागणी

महाराष्ट्रात काही महिन्यांपासून मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभारलंय. या सगळ्या धर्तीवर शरद पवार यांनी काहीतरी बोलावं, भूमिका घ्यावी वक्तव्य करावं अशी मागणी केली जात होत होतं. आता आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.

मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बंडानंतरचे भेदाभेद विसरुन शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थान आणि काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची याच मुद्द्यावर भेट घेतील असं छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं. त्यानुसार काही दिवसांतच शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 22 जुलै रोजी भेट घेतली होती. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा पार पडली होती.

Eknath Shinde - Sharad Pawar.jpg
Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge : पालकमंत्री मुश्रीफांचे 'षटकार', तर घाटगेंचं 'कॅच'; कागलमध्ये सुरू झालाय 'रिल्स वॉर'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com