Solapur, 07 September : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस किती जागांवर दावा करणार आहे, हे मला माहिती नाही. पण, सोलापूर शहरातील शहर उत्तर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांनी केला खरा. पण, काँग्रेसच्या शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी तो दावा खोडून काढताना राष्ट्रवादी या मतदारसंघातून दोन वेळा हरली आहे. पण, आम्ही ती जागा जिंकण्याच्या परिस्थितीत आहोत, असे स्पष्टपणे सांगितले.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकरापैकी सुमारे सात जागांवर काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात आलेला आहे. त्यावर पक्षाचे नेते महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी महाविकास आघाडीत आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) किती जागा लढवणार आहे, याची मला माहिती नाही. कारण, जिल्ह्यातील राजकारणावर मी बोलणार नाही, त्याचा मला अभ्यासही नाही.
सोलापूर शहरातील तीनपैकी एक सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा आपल्याला मिळणार आहे. हा मतदारसंघ लढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे, असेही कोठे यांनी स्पष्ट केले. कोठे यांच्या शहर उत्तरच्या दाव्यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे (Chetan Narote) यांनी उत्तर दिले आहे.
ते म्हणाले, प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील सहाच्या सहा विधानसभेच्या जागा मागाव्यात, अशी काँग्रेसच पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. सोलापूर शहर उत्तर मतदासंघातून निवडणूक लढविण्यासाठी दहा ते बारा लोक इच्छूक आहेत, त्यामुळे आम्ही ती मागणी करत आहोत.
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस दोनवेळा पराभूत झाली आहे, त्यामुळे काँग्रेसकडून ती जागा मागितली जात आहे. आम्ही ती जागा जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहेात, असा दावाही नरोटे यांनी केला.
आडम मास्तरांना मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच नाही
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांना देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना आम्ही एक वेळ पाठिंबा दिला होता, आता त्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे, अशी अपेक्षाही चेतन नरोटे यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला, तर सहाही मतदारसंघातून आमच्याकडे भरपूर अर्ज आलेले आहेत. आमच्याकडे सक्षम उमेदवारही आहेत. त्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार दिले तर निश्चित विजयी होतील. महाविकास आघाडीत ज्या पक्षाचा आमदार तो मतदारसंघ संबंधित पक्षाला सुटणार आहे. पण, मागायचं काम आमचं आहे. आमच्याकडे उमेदवारही सक्षम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.