Kolhapur, 26 May : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विधासभेला यश मिळाल्यानंतर महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीतील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत, त्यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा शब्द दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही नगरसेवक शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते.
तोच धागा पकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे. काँग्रेसचे केवळ 10 नगरसेवक येणार नसून तब्बल 35 नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टप्याटप्याने क्षेपणास्त्र डागून विरोधकांचे राजकीय ताल उद्ध्वस्त करणार असल्याचही क्षीरसागरांनी स्पष्ट केले. क्षीरसागर यांनी केलेल्या दाव्यामुळे सतेज पाटलांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
राजेश क्षीरसागर हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूर शहरातील ३५ माजी नगरसेवक शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. त्याची योग्य वेळी माहिती देऊ. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही जणांचे प्रवेश होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसच्या काही प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहे. आम्ही निवडणूक नेहमीच ताकदीने लढवतो. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कोल्हापुरात लक्ष घातले आहे, त्यामुळे कोल्हापुरात शिवसेनेचा पहिला महापौर होणार’, असा विश्वासही आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘यापूर्वीच्या पालकमंत्र्यांना विचारा, त्यांनी शहरासाठी काय केले? आज विकासासाठी शेकडो कोटींचा निधी आणला जात आहे. त्यामुळेच अन्य पक्षांतील काही नेते, कार्यकर्ते, माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करत आहेत. शिवसेनेत अन्य पक्षांतील 35 माजी नगरसेवक येतील. त्यातील काहीजणांचा प्रवेश जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल.’
माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दोन महापालिका निवडणुका लढवल्या. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले; पण अपेक्षित यश मिळाले नाही. पण आता काही कमी पडणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत कोल्हापूरला शिवसेनेचा पहिला महापौर मिळेल. पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी सत्तेचा गैरफायदा घेतला. त्यांनी शहरासाठी काय केले, शहराचा कोणता प्रश्न सोडवला? महापालिकेत त्यांची सत्ता होती. कोणते काम त्यांनी करून दाखवले?’ अशी टीकाही राजेश क्षीरसागर यांनी केली.
हद्दवाढ या प्रश्नावर बोलताना नाना कदम यांनी बहिष्कार टाकावा, असे वक्तव्य केले आहे, त्यावर मी काही बोलणार नाही. पण, हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक नको, या भूमिकेचा मी आहे. पण हद्दवाढ होणार असल्याचं क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.