Sarkarnama Exclusive : Satyajeet Patankar : दोन्ही राजेंची शिष्टाई अन्‌ बडोद्यातून सूत्रे हलताच पाटणकर भाजप प्रवेशासाठी राजी झाले...!

Satara Political News : ज्येष्ठ नेते शरद पवारांशी दोन पिढ्यांपासून निष्ठा राखून असलेले पाटणकर कुटुंबीय अखेर तुतारीला रामराम करत कमळ हाती घेणार, हे आता स्पष्ट झाले आहे. अख्खी हयात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीत घालविल्याने पवारांना सोडण्याबाबत विक्रमसिंह पाटणकर हे द्विधा मन:स्थितीत होते.
Udayanraje Bhosale-Shivendraraje Bhosale-Satyajeet Patankar
Udayanraje Bhosale-Shivendraraje Bhosale-Satyajeet PatankarSarkarnama
Published on
Updated on

Satara, 25 May : ज्येष्ठ नेते शरद पवारांशी दोन पिढ्यांपासून निष्ठा राखून असलेले पाटणकर कुटुंबीय अखेर तुतारीला रामराम करत कमळ हाती घेणार, हे आता स्पष्ट झाले आहे. अख्खी हयात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीत घालविल्याने पवारांना सोडण्याबाबत विक्रमसिंह पाटणकर हे द्विधा मन:स्थितीत होते. मात्र, पाटणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप प्रवासामागे साताऱ्याच्या दोन्ही राजांनी आणि बडोद्यातील नातेवाईकांनी मोठी भूमिका बजावल्याची माहिती आहे. बडोद्याच्या नातेवाईकांचा आग्रह आणि उदयनराजे, शिवेंद्रराजे भोसले यांची गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली शिष्टाई फळाला आली असून पाटणमध्ये उद्या (सोमवारी, ता. 24 मे) होणाऱ्या पाटणकरांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे.

साताऱ्याच्या (satara) राजकारणात कायम शरद पवारांना साथ देणाऱ्या पाटणकरांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेचा फायदा झाला नाही. त्यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याची सूचना यायची. कारण त्या वेळीही शंभूराज देसाई हे मंत्री होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्येही देसाई यांचे मंत्रिपद कायम राहिले, त्याचा फटका पाटणकरांना बसत गेला. पण विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत जेव्हा पाटणची जागा आघाडी धर्माचे कारण सांगून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सोडली, तेव्हा पाटणकरांना मोठा धक्का बसला. त्यानंतरच पवार आणि पाटणकरांमध्ये अंतर पडत गेले.

विधानसभा निवडणुकीत पक्षीय ताकद पाठीशी नसतानाही सत्यजीत पाटणकरांनी (Satyajeet Patankar) तब्बल ९० हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यापूर्वीच्या २०१९ आणि २०१४ च्या निवडणुकीत पाटणकरांनी ९० हजारांच्या आसपास मते मिळविली होती. महाविकास आघाडीच्या काळात पवारांनी बोट सोडल्याने पाटणकरांचे कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्यामुळेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी पाटणकरांवर भाजप प्रवेशासाठी दबाव वाढवला होता.

विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजीत पाटणकर हे भाजप (BJP) प्रवेशाबाबत उघडपणे बोलायला तयार नव्हते. पण, बडोद्यातील नातेवाईकांचा भाजप प्रवेशाचा पाटणकरांना आग्रह होता. भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याची सूचना बडोद्यातील भाजपशी संबंधित नातेवाईक करत होते. त्यानंतरही पाटणकर शांत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सूत्रे हाती घेतली आणि थेट विक्रमसिंह पाटणकर यांना भाजप प्रवेशाबाबत साकडे घातले.

Udayanraje Bhosale-Shivendraraje Bhosale-Satyajeet Patankar
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंची पुन्हा वाद्‌ग्रस्त मागणी; मराठा समाजाचा भिडेंच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा

उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मनोमिलनासाठी विक्रमसिंह पाटणकर आणि शिवाजीराव भोसले यांनी प्रयत्न केले होते. तो ओलावा दोन्ही राजे आणि पाटणकरांमध्ये होता, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पडझड होत असलेल्या पाटणकरांना ‘ऊर्जा’ देण्यासाठी दोन्ही राजेंनी हात दिला. बडोद्यातील नातेवाईकांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत हलविलेली सूत्रे आणि दोन्ही राजेंची शिष्टाई फळाला आली असून सत्यजीत पाटणकरांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर पाटणकर यांनी भाजपसोबत यावे, असा आग्रह दोन्ही राजे, कार्यकर्ते आणि नातेवाईकांचा होता. त्यानंतर पाटणकरांनी हिरवा कंदील दाखवला होता. पाटणकरांनी उभारलेल्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाला देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे सांगितले जाते. यावेळी, तसेच सत्यजित पाटणकर यांच्या वाढदिनी त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी चर्चा होती. मात्र, दोन्ही मुहूत टळले आहेत. मात्र, शिवेंद्रराजेंच्या पुढाकाराने फडणवीसांच्या भेटीनंतर हा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. मात्र, विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांनी याबाबत जाहीरपणे एकदाही शब्द काढलेला नाही.

Udayanraje Bhosale-Shivendraraje Bhosale-Satyajeet Patankar
Satara Politic's : फडणवीसांची साताऱ्यात मोठी खेळी; अजितदादांना ‘कात्रज’चा घाट दाखवत एकनाथ शिंदेंना घातली वेसन!

फडणवीसांचा हिरवा कंदील

महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले शंभूराज देसाई हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध राखून असल्याचे बोलले जाते. पण, ते पाटणकरांच्या भाजप प्रवेशाला आडवे येतील की काय अशी चर्चा होती. मात्र, पाटणच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांकडे पाटणकरांच्या प्रवेशाबाबत विषय काढला होता, त्या वेळी भाजप पक्ष म्हणून आणि संघटना मजबूत होत असेल तर मैत्री, संबंध आडवे येणार नाहीत, असे फडणवीसांनी स्पष्ट करत पाटणकरांच्या भाजप प्रवेशबाबत हिरवा कंदिल दाखवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com