Kolhapur politics : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे-शिंदे गटात जुंपली, राजेश क्षीरसागर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप

Kolhapur Shivsena Rajesh Kshirsagar VS Ravikiran Ingwale : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Rajesh Kshirsagar
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Rajesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 21 Sep : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे.

ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा थेट आरोप केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप केल्यामुळे शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि क्षीरसागर यांच्या बदनामीसाठीच इंगवले यांचा हा खेळ सुरू असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण यांनी केला आहे.

इंगवलेंचा आरोप काय?

रविकिरण इंगवले म्हणाले, राज्यातील आदर्श घोटाळ्यावरून 'सीपीआर'मधील घोटाळ्याला 'राजेश घोटाळा' असे नाव द्यावे लागेल. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्या पत्रामुळे सीपीआर रुग्णालयात 5 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी केला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Rajesh Kshirsagar
Sharad Pawar And Uddhav Thackeray : 'शरद पवारांनी ठाकरेंचं 'हे' स्वप्नं धुळीस मिळवलं..'; 'या' नेत्याचा पुण्यातून मोठा दावा

दोन वर्षासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य पंधरा वर्षासाठी खरेदी करण्यात आले आहे. CPR मधील गैरव्यवहार प्रकरणी राजेश क्षीरसागर यांच्यासह दोषींवर कारवाई करावी अन्यथा कोर्टात जाणार असल्याचा इशाराही इंगवले यांनी दिला आहे.

तर राजकीय स्टंटसाठी रविकिरण इंगवले यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या परिषदेतून त्यांचा निव्वळ राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातील द्वेष दिसून आला. यासह त्यांचा बालिशपणाही जनतेला कळाला. निविदा प्रक्रिया राबविताना डीन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. ही समिती शासकीय साहित्यांची खरेदी-विक्री प्रक्रिया राबवण्याचे सर्व निर्णय घेत असते आणि त्या आधारे साहित्यांची खरेदी केली जाते. याची माहीती रवीकिरण इंगवले यांना नसल्याने बिनबुडाचे आरोप केलेले आहेत.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Rajesh Kshirsagar
Rahul Jagtap : 'वस्ताद'कडून विजयाचा फिक्स शब्द घेतला; आता राहुल जगताप 'डाव' टाकणार

या खरेदी प्रक्रियेत काय गैरव्यवहार झाला असल्यास शासन आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करेल. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात हजारो पत्रे दिली जातात. त्यांच्याकडे अनेक व्यक्ती पत्राची मागणी करतात. अशा अनेक प्रकरणात बऱ्याच लोकप्रतिनिधीनी पत्रे दिले आहेत. त्याचप्रमाणे राजेश क्षीरसागर यांनीही पत्र दिलं.

राजेश क्षीरसागर यांच्याकडे कोण चोर कोण गुन्हेगार याची चौकशी करायला वेळ नाही. नाही तर इंगवले सारखे गुंड कधीच शिवसेना शहर प्रमुख झाले नसते. असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com