Chandrakant Patil-Girish Mahajan-Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी प्रथमच मंत्र्यांची समन्वय समिती; चंद्रकांत पाटलांसह तिघांचा समावेश...

Pandharpur Yatra 2024 : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच मोठा निर्णय घेतला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 July : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या नियोजनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा समावेश आहे.

सोलापूरचे (Solapur) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंढरपूर (Pandharpur) देवस्थानचे कार्यकारी अधिकारी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व इतर संबंधित सर्व अधिकारी हे आषाढी एकादशीच्या (Ashadhi Wari) निमित्त प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा अहवाल वेळोवेळी या समितीला सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंढरपूरचा दौरा करत आषाढी वारीच्या तयारीची पूर्वपाहणी केली होती. 65 एकरांतील सोयी सुविधा तसेच, चंद्रभागा नदीची पाहणी करून नदी पात्रातील स्वच्छतेसंदर्भात जिल्हा प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना केल्या होत्या. पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट याबाबतची माहिती घेत स्वच्छतेसंदर्भात सल्लाही दिला होता.

पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने खास आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, त्या आरोग्य शिबिरात गोळ्या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याची खातरजमा करून घेतली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या बुलेटवर बसून पंढरपूर शहरातून फेरफटका मारत शहरातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तसेच, प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत.

पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात गिरीश महाजन आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT