Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील 'ॲक्टिव्ह मोड'वर, मंडलिकांच्या पराभवाची कारण शोधण्यासाठी बैठकांचा धडाका

loksabha Election Result Chandrakant Patil : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवाराला कोणत्या बूथवर कमी मताधिक्य मिळाले, पराभवाची नेमकी कारण कोणती ? याचा चंद्रकांत पाटलांनी आढावा घेतला.
Chandrakant Patil
Chandrakant Patil sarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला. महाराष्ट्रात अवघ्या 17 जागा महायुतीला मिळाल्या. कोल्हापूर मतदारसंघातील संजय मंडलिक यांचा पराभव देखील महायुतीच्या जिव्हारी लागली आहे. या पराभवाचे कारण शोधण्यासाठी मंत्री चंद्रकात पाटील यांनी बैठकींचा धडाका लावला आहे.

बैठकीला स्वतः चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजीत सिंह घाटगे आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघ निहाय आढावा घेतला.

चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवाराला कोणत्या बूथवर कमी मताधिक्य मिळाले, पराभवाची नेमकी कारण कोणती ? आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी बैठक शिवाय विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मताधिक्य वाढवता येईल यावर बैठकीत चर्चा केली.

Chandrakant Patil
Kishore Darade Vs Vivek Kolhe : आमदार किशोर दराडेंना विवेक कोल्हेंची भीती का वाटते?

विधानसभेची तयारी

लोकसभेतील Lok Sabha पराभवामुळे चंद्रकात पाटील सावध झाले आहेत. अवघ्या पाच सहा महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आत्ताच तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा निहाय आढावा घेत महायुती कुठे कमी पडली, याचा शोध घेतला जात आहे.

25 वर्षानंतर कोल्हापूर काँग्रेसकडे

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात 25 वर्षानंतर काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार संजय मंडलिक यांचा तब्बल 1 लाख 53 हजार 309 मतांनी पराभव केला.

Chandrakant Patil
Praniti Shinde : खासदार झाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदेंचा ‘टमटम’मधून प्रवास!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com