Solapur DCC Bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : सोलापूर डीसीसी बॅंकेची निवडणूक लवकरच होणार; कोर्टाचे प्रशासकाला कार्यक्रमाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

Kolhapur Circuit Bench Order : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम आठवडाभरात सादर करण्याचे आदेश दिले. आदेश न पाळल्यास प्रशासक बदलण्याचा इशाराही न्यायालयाने दिला.

प्रमोद बोडके

Solapur, 02 July : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून तो आठवडाभरात आमच्यासमोर प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सादर करा. या आदेशाचे पालन न केल्यास प्रशासकाची हकालपट्टी करून त्या ठिकाणी नव्या प्रशासकीचा नियुक्ती करून त्या माध्यमातून निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

मंगळवेढा तालुक्यातील बावची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने जिल्हा बँकेची निवडणूक घ्यावी, यासाठी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या सुनावनीदरम्यान न्यायालयाने कडक ताशेरे ओढताना निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबतचे संकेत दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी येत्या बुधवारी (ता. ८ जुलै) होणार आहे, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकाने कोणती चौकशी केली, कोणती पाऊले उचलली किंवा पूर्वी कोणते आदेश पारित केले आहेत, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. न्यायालयाने २१ मार्च २०२५ रोजी एक आदेश पारित करत प्रशासकाच्या नियुक्तीला मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे न्यायालयाने प्रशासकाला धारेवर धरत पुढील सुनावणीवेळी निवडणूक कार्यक्रमासह सुनावणीला उपस्थित राहण्याची सूचना न्यायमूर्ती मिलिंद जाधव व नंदेश देशपांडे यांनी दिली आहे.

न्यायालयाच्या निर्देशाचे प्रशासकाने पालन केल्यास प्रशासकाच्या हकालपट्टीचाही इशारा न्यायमूर्तींनी दिला आहे. जिल्हा बॅंकेतील अपहार अथवा पैशाच्या गैरवापरासंदर्भात प्रशासकाने तपास केला असला. यापुढील कामकाज कायद्यानुसार बँकेच्या निर्वाचित मंडळाद्वारे चालविले जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

जिल्हा बॅंकेतील गैरव्यहाराचा इतिहास, निधीचा अपहार तसेच प्रशासकाने गेल्या आठ वर्षांत काय पावलले उचलली आहेत, याची माहिती प्रशासकाच्या प्रतिज्ञापत्रातून आम्हाला समजणार आहे. या प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे प्रशासकाच्या भूमिकेचे मूल्यमापन करता येईल आणि त्याद्वारे बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम निश्चित करता येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

बावची सोसायटीच्या वतीने ॲड. सारंग आराध्ये आणि ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी, तर जिल्हा बँकेकडून ॲड. भूषण वाळिंबे यांनी काम पाहिले. आता बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भातील पुढील सुनावणी येत्या ८ जुलै रोजी होणार आहे. त्या सुनावणीत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार का, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रशासकाची बदली, पण जिल्हा बॅंकेचा अतिरिक्त पदभार कायम

जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांची नाशिकचे जिल्हा उपनिबंधक म्हणून बदली झाली. त्याच दिवशी कोर्टाच निर्देश आले आहेत. प्रशासक भोळे यांची बदली झाली असली, तरी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे, त्यामुळे भोळे यांच्याकडे सोलापूर डीसीसी बॅंकेचा अतिरिक्त पदभार असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT