Bhaskar Bhagre : पवारांच्या नाशिकच्या शिलेदाराने खासदार फुटीच्या चर्चा फेटाळल्या, शरद पवारांच्या कारकिर्दीचा दाखला देत काय म्हणाले?

Bhaskar Bhagre NCP Sharad Pawar : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील फुटीच्या चर्चा फेटाळल्या. पक्षात तसे काहीही सुरु नाही..चर्चांना काही अर्थ नाही असं भास्कर भगरेंनी म्हटलं आहे.
Bhaskar Bhagre, Sharad Pawar
Bhaskar Bhagre, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी करुन दाखवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर सचिन अहिर यांना आपल्या गटात घेऊन त्यांना विधानपरिषदेचे उपसभापती करुन शिंदेंनी ठाकरेंना दुसरा धक्का दिला. त्यामुळे ठाकरेंचे इतर आमदार देखील फुटणार असल्याचा दावा सत्ताधारी नेते करताना दिसत आहेत.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार-आमदार फुटणार असल्याच्या चर्चांणा राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. याबाबत चर्चांना कोणताही आधार नाही आणि पक्षाचा एकही खासदार पक्ष सोडणार नाही, असा ठाम विश्वास स्वत: खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

पक्षातील नेत्यांनाही तसा विश्वास असून याबाबत पक्षाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीत कोणतीही फूट किंवा पक्षांतराची चर्चा नाही. खासदार शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका भगरे यांनी स्पष्ट केली. एका खासगी वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला.

पक्षाच्या विलीनीकरणावर बोलताना, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनापूर्वी काही चर्चा सुरु होत्या. पंरतु त्यांच्या अकाली निधनानंतर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोणत्याही प्रकारची फूट किंवा पक्षांतरांची चर्चा झाली नसल्याचे भगरेंनी सांगितले. आम्ही सगळे खासदार दिल्लीत एकोप्याने सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. पवार साहेबांचेही मार्गदर्शन सातत्याने मिळत आहे. राज्यातही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्रितपणे पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Bhaskar Bhagre, Sharad Pawar
Bhaskar Rao Bhagre: कांद्याचा संताप रस्त्यावर!, चांदवडमध्ये आज महामार्ग रोको; भगरे-वाजेंसह शेतकरी आक्रमक

मागच्या महिन्यात पक्षाची जी बैठक झाली त्यात, केवळ पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबतच चर्चा झाली. कुणी पक्ष सोडणार किंवा दुसऱ्या पक्षात जाणार अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिले आहे. पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार एकत्र असून, राजकारणात चाललेल्या चर्चांना काही अर्थ नाही. कामानिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी होत असल्या तरी त्यातून वेगळा अर्थ काढण्याचे कारण असल्याचे भगरे म्हणाले.

Bhaskar Bhagre, Sharad Pawar
Amol Kolhe : ‘ऑफर आली तर विचार करेन’; शरद पवारांच्या खासदार अमोल कोल्हेंनी फडणवीसांचं कौतुक करत वाढवल्या चर्चांना उधाण

सगळ्यांना वाटतं सत्तेत गेलं पाहीजे परंतु विरोधात राहुनही खूप चांगले काम करता येते हे आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दाखवलेलं आहे. त्यामुळे तोच आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवून आहोत. पक्ष संघटने संदर्भातील तसेच भविष्यातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार यांना देण्यात आले असून, ते जो निर्णय घेतील त्यामागे पक्षाचे सर्व खासदार ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही खासदार भास्कर भगरे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com