Nagesh Ashtekar Challenges : 'कोणात खुमखुमी असेल तर यावं समोर', नागेश पाटील आष्टीकरांचे थेट ठाकरेंच्या शिवसेनेला चॅलेंज

Nagesh Ashtekar Challenges Uddhav Thackeray : श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर संतप्त झालेल्या नागेश पाटील आष्टीकरांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेला चॅलेंज केले.
Uddhav Thackeray Birthday Wish Nagesh patil Ashtikar News
Nagesh patil Ashtikar NewsSarakaranma
Published on
Updated on

Nagesh Ashtekar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून थेट शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार नागेश पाटील अष्टेकर यांनी संताप व्यक्त करत थेट ठाकरेंच्या शिवसेनेला चॅलेंज केले आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर श्रीकांत शिंदे असताना त्यांना ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. श्रीकांत शिंदेंच्यासोबत नागेश पाटील आष्टीकर हे देखील होते. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

काळे झेंडे दाखल्याने आष्टीकर संतप्त झाले होते. ते म्हणाले, 'कोणी आव्हान दिलं तर मी आव्हान तर घेणारच ना, स्वीकारणारच ना! मी चार-पाच, सात दिवस झालं फिरतोय, रोज आहे मी हदगावमध्ये. माहूरमध्ये सुद्धा मी गेलो. मग मला दाखवायचे काळे झेंडे? मग आजच कशाला प्रयत्न करायचा?'

'त्यामुळे कोणी जर आव्हान देत असेल तर मी घेणार आव्हान, कोणात असेल खुमखुमी तर या पुढे मी तयार आहे. मी प्रत्येक गावात फिरणार आहे', असे थेट चॅलेंज त्यांनी दिले.

उद्धव ठाकरेंनी साधला संवाद

ठाकरेंच्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यत देखील घेतले होते. दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी संवाद साधला. 'तुमच्या सर्वांच्या मी पाठिशी आहे, काळजी करू नका, तुम्ही चांगले काम करत आहात, गद्दाराच्या विरोधातील ही लढाई अशीच पुढे चालू द्या, असे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Birthday Wish Nagesh patil Ashtikar News
PCMC Police Transfers : पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल; 6 वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या, कोणाला कुठे मिळाली नियुक्ती?

श्रीकांत शिंदेंकडून आढावा

नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पक्ष मेळावा घेत श्रीकांत शिंदे यांनी संघटनात्मक आढाव घेतला. तसेच संघटना मजबूत करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Uddhav Thackeray Birthday Wish Nagesh patil Ashtikar News
Thackeray Vs Shinde: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी केलेल्या बड्या नेत्याला दाखवले काळे झेंडे; उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांची थोपटली पाठ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com