Ranjitsinh Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : रणजितसिंह मोहिते पाटलांना दणका; पीए म्हणून काम करणाऱ्या डीसीसी बॅंक कर्मचाऱ्याला दाखवली कर्नाटकची बॉर्डर...

Ranjitsinh Mohite Patil News : एच. बी. शेटे हे माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेत लिपिक पदावर रुजू होते. मात्र, शेटे हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 January : लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षापासून अंतर राखून वागणारे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना महायुती सरकारने दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे लिपिक एच. बी. शेटे हे मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. त्यांचा पगार मात्र जिल्हा सहकारी बॅंकेतून निघत होता. त्या शेटे यांची आता जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी थेट कर्नाटकच्या बॉर्डरवर असलेल्या अक्कलकोटमध्ये बदली आहे. त्यामुळे भाजपकडून मोहिते पाटील यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे (Solapur DCC Bank ) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या सहीने हा आदेश काढण्यात आलेला आहे. एच. बी. शेटे हे माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेत लिपिक पदावर रुजू होते. मात्र, शेटे हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. याबाबतची तक्रार माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी जिल्हा बॅंकेकडे केली होती. सातपुते यांच्या तक्रारीनंतर जिल्हा बॅंकेने कडक धोरण स्वीकारत शेटे यांना माळशिरसमधील यशवंतनगरमधून थेट अक्कलकोटमध्ये बदली करण्यात आली आहे.

राजेंद्र शिंदे यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, एच. बी. शेटे लिपिक यशवंतनगर शाखा यांना कळविण्यात येते की, शेटे यांनी प्रशासकीय सुलभतेसाठी अक्कलकोट शाखेतील शाखाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत लिपिक म्हणून काम करावे. जिल्हा बॅंकेच्या प्रशासनाकडून मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यासाख्या बड्या प्रस्थाच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याने सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून राम सातपुते यांनी भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातही त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना लक्ष्य केले आहे. मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे लावून धरलेली आहे. ते सुरू असतानाच मोहिते पाटील यांचे खच्चीकरणासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने मोहिते पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाले. विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून उत्तम जानकर यांना निवडून आणले आहे. त्या निवडणुकीत सातपुते यांचा अवघ्या काही हजारांनी पराभव झाला आहे, तो जिव्हारी लागल्याने सातपुते यांनी मोहिते पाटील विरोधाची मोहिम उघडल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT