सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक : मोहिते-पाटील आणि दिलीप सोपल यांच्याकडे अडकले ३६६ कोटी

विजय शुगरची विक्री करून देखील डीसीसीची पूर्ण कर्जवसुली झालेली नाही.
VIjay Mohite-Patil & Dilip Sopal Latest News
VIjay Mohite-Patil & Dilip Sopal Latest News Sarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला आर्थिक अडचणीत आणणाऱ्या विजय शुगर (करकंब, ता. पंढरपूर) व आर्यन शुगर (खामगाव, ता. बार्शी) या दोन्ही खासगी साखर कारखान्यांची विक्री प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या काळात झाली आहे. या दोन्ही कारखान्यांची विक्री होऊन देखील या दोन्ही कारखान्यांच्या जुन्या मालकांकडे डीसीसीचे तब्बल ३६६ कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी डीसीसीला आगामी काळात धाडसी प्रयत्न करावे लागणार आहेत. (VIjay Mohite-Patil & Dilip Sopal Latest News)

VIjay Mohite-Patil & Dilip Sopal Latest News
संतोष बांगर चिडले : विनायक राऊतांनी काय काय उकळलं.. याचा हिशोब सांगितला....

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या परिवाराशी निगडित असलेल्या विजय शुगरला डीसीसीने २०१०-११ मध्ये १३० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. कर्ज घेतल्यानंतर २०१४ पासून हा कारखाना डीसीसीच्या थकबाकीदारांमध्ये राहिला. या काखान्याकडून २०२ कोटी रुपयांची येणे बाकी डीसीसीला होती. प्रशासक कोतमिरे यांच्या काळात या कारखान्याची विक्री झाली. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने विजय शुगरची १२५ कोटी रुपयांना खरेदी केली. विजय शुगरच्या जुन्या मालकांकडे डीसीसीचे अद्यापही ७७ कोटी रुपये अडकले आहेत. विजय शुगरची विक्री करून देखील डीसीसीची पूर्ण कर्जवसुली झालेली नाही.

VIjay Mohite-Patil & Dilip Sopal Latest News
एकनाथ शिंदे वाचणार आता RSS चे विचार; मोहन भागवतांनी दिले जाडजूड पुस्तक भेट

माजीमंत्री दिलीप सोपल यांच्याशी निगडित असलेल्या आर्यन शुगरला डीसीसीने २०१०-२०११ मध्ये १४८ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. हा कारखाना देखील सुरवातीपासूनच थकबाकीदारांच्या यादीत राहिला. या कारखान्याकडून डीसीसीला तब्बल ३६० कोटी रुपयांचे येणेबाकी होती. प्रशासक कोतमिरे यांनी त्यांच्यातील प्रशासकीय कौशल्य वापरून तांत्रिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या आर्यन शुगरची नुकतीच विक्री केली आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष तथा येडेश्‍वरी ॲग्रो प्रॉडक्‍टस्‌चे बजरंग सोनवणे यांनी हा कारखाना विकत घेतला आहे. कारखाना विकल्यानंतरही आर्यन शुगरच्या जुन्या मालकांकडे डीसीसीचे २८९ कोटी रुपये थकित आहेत. आर्यन व विजय शुगरकडे असलेल्या येणे बाकीच्या उर्वरीत रकमा वसूल करण्यासाठी डीसीसी बॅंक महाराष्ट्र सहकार कायद्यातील कलम ९१ चा आधार घेणार आहे. या कलमानुसार या दोन्ही कारखान्यांच्या जुन्या संचालक मंडळाच्या मालमत्तेचा शोध घेऊन त्या मालमत्तेवर टाच आणली जाणार आहे. त्या दृष्टीने डीसीसीने प्रयत्न सुरू केले आहेत.

VIjay Mohite-Patil & Dilip Sopal Latest News
सोमय्यांनी आरोप करायचे आणि अस्लम शेख- मोहित कंबोज यांनी गळ्यात गळे घालायचे!

डीसीसीमध्ये असलेल्या सर्वसामान्यांचा पैसा हा सुरक्षित आहे. डीसीसीची येणीबाकी असलेली रक्कम पूर्णपणे वसूल केली जाणार आहे. यासाठी सहकार कायद्यातील कलम ९१ चा आधार घेतला जाणार आहे. उर्वरीत रक्कम वसुलीसाठी सहकार न्यायालयातही डीसीसीच्यावतीने धाव घेण्यात आली आहे. या प्रयत्नांनाही यश मिळेल,असे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे प्रशासक शैलेश कोतमिरे म्हणाले.

आकडे बोलतात...

आर्यन शुगर

- एकूण येणेबाकी : ३६० कोटी रुपये

- कारखाना विक्रीतून मिळालेली रक्कम : ७१ कोटी (६८ कोटी ६४ लाख कारखान्यातून व २ कोटी ३६ लाख जमिनीचे)

- कारखान्याच्या जुन्या मालकाकडे राहिलेली रक्कम : २८९ कोटी

---

विजय शुगर

- एकूण येणेबाकी : २०२ कोटी रुपये

- कारखाना विक्रीतून मिळालेली रक्कम : १२५ कोटी रुपये

- कारखान्याच्या जुन्या मालकाकडे राहिलेली रक्कम : ७७ कोटी रुपये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com