Konkan Politic's : मला अन्‌ राजन साळवींना शिंदे गटाकडून ऑफर होती; ठाकरेंच्या निष्ठावंतांचा गौप्यस्फोट

Vaibhav Naik Secret Explosion : आगामी काळातही आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. कारण, आज सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आमच्यासोबत आहे.
Vaibhav Naik-Rajan Salvi-Uddhav Thackeray
Vaibhav Naik-Rajan Salvi-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg, 04 January : लोकसभा निवडणुकीनंतर मला आणि माजी आमदार राजन साळवी यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर होती. पण आम्ही निष्ठावंत म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो. आज आमच्यासमोर अनेक अडचणी आहेत. मात्र, त्या अडचणींवर मात करून आगामी काळातही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहू, असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

राजापूरचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, खुद्द साळवी यांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावत मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक असून उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरच माजी आमदार वैभव नाईक यांनीही साळवींबद्दल खात्री दिली आहे.

माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटाकडून आलेल्या ऑफरचीही माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटाकडून आलेली ऑफर आम्ही धुडकावली. त्यामुळे आगामी काळातही आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. कारण, आज सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आमच्यासोबत आहे, असेही वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

Vaibhav Naik-Rajan Salvi-Uddhav Thackeray
Walmik Karad : अटकेचा परळी पॅटर्न ते वाल्मिक कराडचा पुण्याच्या हॉस्पिटलमधील मुक्काम; संदीप क्षीरसागरांनी सगळंच काढलं

वैभव नाईक म्हणाले, माजी आमदार राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. गेली पंधरा वर्षांपासून ते शिवसेनेचे आमदार म्हणून काम करत होते. गेली अडीच वर्षांपासून ते निष्ठावंत म्हणून उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे होते, त्यामुळे राजन साळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडणार नाहीत, याची मला खात्री आहे. शिवसेना पक्ष अडचणीत असताना ते पक्षासोबत कायम राहतील, असा मला विश्वास आहे.

विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजन साळवी यांच्या विरोधात पक्षातील वरिष्ठांनी काम केले असेल किंवा राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी काम केले असेल तर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर उद्धव ठाकरे निश्चितपणे कारवाई करतील, असा विश्वासही नाईक यांनी बोलून दाखवला.

Vaibhav Naik-Rajan Salvi-Uddhav Thackeray
Vidarbha News : आशिष देशमुखांचा अवैध वाळू वाहतूकदारांना दणका; स्वतः ट्रकवर चढून पकडली वाळू!

निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राजन साळवी यांना आज सर्वसामान्यांमध्ये किंमत आहे. ती किंमत इतर पक्षात जाऊन होणार नाही. राजन साळवी हे अनेक वर्षे शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिक काम करीत आहेत, त्यामुळे ते शिवसेना सोडणार नाहीत, याची मला खात्री आहे, असेही वैभव नाईक यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com