Grampanchayat Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Grampanchayat Election News: ओम राजे निंबाळकर यांना जीवे मारण्याची धमकी!

Death threat in grampanchayat election: तुळजापुर तालुक्यात मसला खुर्द या गावी येथे ही घटना घडली.

सरकारनामा ब्यूरो

Grampanchayat Election 2022: ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. आज प्रचाराची सांगता होईल.मात्र या दरम्यान उमेदवारांला धमकण्याचा प्रकार पुढे आला आहे. ग्रामपंचायतीला उभा असलेल्या उमेदवारासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे, ग्रामपंचायत उमेदवार कांताबाई साळवे यांना एका चिठ्ठीत नावांचा थेट उल्लेख करून धमकी दिली गेली आहे. उमेदवाराच्या घरावर अज्ञाताकडून ही धमकी देणारी चिठ्ठी चिकटवली आहे. तुळजापुर तालुक्यात मसला खुर्द या गावी येथे ही घटना घडली.

ज्ञानेश्वर साळवे मदत कर. मतदानातून माघार घे. पाठिंबा दे, नाही तर तुझे गावात रहायचे अवघड होईल. तुझा खासदार ओम बाळ, तुझा कलेक्टर आणि तुला नाही तर बघून घेवू. वेळ आली तर संपवून टाकू.वेळ आली तर तुला पण संपवून टाकू.तुला कोण मतदान करतंय आम्ही बघतो.तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरला परिणाम भोगावे लागतील.लई दलित समाजावर उडया मारतोय काय, असा धमकीचा मजकूर चिठ्ठीत लिहण्यात आलं आहे.

सद्या ग्रामपंचयतीच्या निवडणुका होत आहेत. तुळजापूर तालुक्यात मसला खुर्द येथे देखील ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. सर्व पक्ष समंत स्थानिक विकास आघाडीने रामेश्वर वैद्य यांना एकमताने सरपंच म्हणून बिनविरोध निवड केली आहे. यामधील एकूण ११ पैकी तब्बल ७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.आता केवळ उर्वरीत ४ उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे.राष्ट्रवादी किसान सेल प्रदेश सचिव असलेले ज्ञानेश्वर साळवे, यांच्या मातोश्री कांताबाई साळवे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांनाही धमकी देण्यात आले आहे.

माझ्या घरावर धमकीची चिठ्ठी लावून राजकीय द्वेषातून उघडपणे धमकी दिली जात आहे. अशी जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर सरकारने काय सुरक्षा दिली आहे? सरकारने महाराष्ट्राचं बिहार करून टाकलं आहे. आहेत कुठे राज्याचे गृहमंत्री? कुठे आहेत पोलीस ? पोलिसांना तक्रारीसाठी फोन केला. पण पोलिसांनी फक्त १० किलोमीटर अंतरावर येण्यासाठी २ तास घेतले. यावर आता २४ तासांत कारवाई नाही झाली, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल,असा इशारा ज्ञानेश्वर साळवेंनी दिला आहे.

मतदारांवर दबाव आणण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजेत. मला आता सोशल मीडियातूनच कळलं की, धमकी दिल्याचं. पोलिसांनी याची कसून तपास करावा. ज्यांनी हे केलंय त्यांना शोधून कडक शिक्षा झाली पाहिजे. उमेदवारांवर आणि नागरिकांवर कोणताही दबाव येणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे.

जे कोणी संस्काराची भाषा बोलत होते, त्यांचे संस्कार यातून दिसत आहेत. साध्या गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकीत जीवे मारण्याची धमक्या येतात, ही आपली लोकशाही संपवण्याचा प्रकार आहे. थेट नाव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना, खासदारालाच धमकी दिली जाणार असेल, तर निकोप निवडणुका कशा होणार? असा प्रश्नओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT