Deepak Salunkhe-shahajibapu patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Politic's : शहाजीबापूंनी डावलेल्या कट्टर समर्थकाला दीपक साळुंखेंकडून पायघड्या; तीन वेळा नगरसेवक राहिलेले नेत्याने सोडली जागा

Nagar Parishad Election 2025 : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 10 मध्ये उमेदवारीवरून शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे गट आमनेसामने आले असून संघर्ष तीव्र झाला आहे.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १० मधील उमेदवारीवरील वादामुळे मोठे राजकीय नाटक रंगले.
शिवसेनेचे कट्टर समर्थक समीर पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होऊन दीपक साळुंखे यांच्या गटात दाखल झाले.
सलग तीन वेळा नगरसेवक असलेल्या सोमनाथ लोखंडे यांनी स्वतःचा अर्ज मागे घेत समीर पाटील यांना पाठिंबा दिल्याने लढत अधिक चुरशीची झाली आहे.

Sangola, 23 November : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत नाराजी, वाद, उमेदवारीतील उलथापालथ अशा राजकीय नाट्याची परंपरा यंदाही ठळकपणे दिसून आली. प्रभाग क्रमांक दहामध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीने संपूर्ण निवडणुकीचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या कट्टर समर्थकाला उमेदवारी नाकारली. त्याला माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या गटाकडून पायघड्या घालण्यात आल्या आहेत. विशेषः म्हणजे तीन वेळा नगरसेवक राहिलेल्य दीपक साळुंखेंच्या कट्टर समर्थकाने शहाजीबापूंच्या समर्थकासाठी जागा सोडली आहे.

माजी आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे युवा शिवसेनेचे शहराध्यक्ष समीर पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने शहरात मोठी चर्चा रंगली. प्रभाग १० मध्ये उमेदवारी जाहीर करताना शहाजीबापूंनी दुसऱ्या कार्यकर्त्याला प्राधान्य दिल्याने पाटील यांच्या गटात नाराजीची भावना तीव्र झाली.

या असंतोषातून पुढे आलेल्या नाट्यमय घडामोडींनी मात्र राजकारणाला अनपेक्षित कलाटणी दिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्ष – शेकाप – दीपक साळुंखे (Deepak Salunkhe ) यांच्या सांगोला शहर विकास आघाडीतून समीर पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले आणि दीपक आबा साळुंखे गटाचे गटनेते सोमनाथ लोखंडे यांनी स्वतःचा अर्ज मागे घेत पाटील यांना मार्ग मोकळा करून दिला आहे. या घडामोडीमुळे प्रभाग १० मधील निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक चुरशीची बनली आहे.

प्रभाग १० मधील गट–तटांचे समीकरण आधीच गुंतागुंतीचे असताना, समीर पाटील यांच्या नव्या प्रवेशाने राजकीय स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळासोबतच सामान्य मतदारांचेही लक्ष आता या प्रभागातील संघर्षावर केंद्रीत झाले आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराचा वेग वाढणार असल्याने या रोमहर्षक लढतीला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्र.१: सांगोला निवडणुकीत सर्वाधिक लक्ष कोणत्या प्रभागावर आहे?
उ: उमेदवारी वादामुळे प्रभाग क्रमांक १० सर्वांचे लक्ष खेचतो आहे.

प्र.२: समीर पाटील का नाराज झाले?
उ: शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले.

प्र.३: समीर पाटील कोणत्या आघाडीतून निवडणूक लढवत आहेत?
उ: भाजप-शेकाप-दीपक साळुंखे यांच्या सांगोला शहर विकास आघाडीतून.

प्र.४: सोमनाथ लोखंडे यांनी काय भूमिका घेतली?
उ: त्यांनी स्वतःचा अर्ज मागे घेऊन समीर पाटील यांना पाठिंबा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT