Uday Samant : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला? फक्त आचारसंहीतेची अडचण; उदय सामंत यांनी मुद्द्यालाच हात घातला

Uday Samant On Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आग्रही असून ते मंत्री भरत गोगावले यांना मिळावे अशी मागणी याच्याआधीच शिंदेंच्या शिलेदारांनी केली आहे.
uday samant, bharat gogawale
uday samant, bharat gogawaleSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये तणाव वाढत आहे.

  2. उदय सामंत यांनी सूचकपणे सांगितले की जानेवारीपर्यंत आचारसंहिता असेल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

  3. या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे भरत गोगावले यांची पालकमंत्रिपदाबाबतची आशा पुन्हा वाढली आहे.

Ratnagiri News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून अद्याप रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असून अजित पवार यांच्याही राष्ट्रवादीने यावर हक्क सांगितला आहे. यावरून येथे वाद वाढतच चालला आहे. अशातच शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं असून पुढच्या चाळीस दिवसातच निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची लॉटरी भरत गोगावले यांना लागेल अशी आता चर्चा सुरू झाली आहे.

भरत गोगावले आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात पालकमंत्री पदावरून गेल्या वर्ष भरापासून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. गोगावले यांच्याकडून तर सतत पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य समोर येताना दिसत आली आहेत. तर ते पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असेही म्हणत असतात. आता तर ते त्यांनाच मिळेल अशी शक्यता निर्माण झाली असून याबाबत उदय सामंत यांनी वक्तव्य केलं आहे.

सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना सध्या राज्यात आचारसंहिता असून ती जानेवारीपर्यंत असणार आहे. यानंतर आपण यावर बोलू. त्यानंतरच यावर निर्णय घेऊ असे सूचक वक्तव्य केलं आहे.

uday samant, bharat gogawale
Raigad Politics : निवडणुकीच्या रिंगणात नेत्यांनी उतरवले वारसदार; २ लेकी, २ सुनांची परंपरा, प्रतिष्ठा पणाला

दरम्यान सामंत यांनी काहीच महिन्यांपूर्वी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना, आपल्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद येण्यात गोगावले यांचे योगदान असून राज्यात राजकीय उलथापालथी होत असतानाच पालकमंत्रीपदाचा तेढ निर्माण झाला होता. त्यावेळी गोगावले यांनी ते मला मिळावे म्हणून आग्रह धरला होता. यामुळेच रायगडचे पालकमंत्रिपद माझ्याकडे आले होते. त्यामुळेच आपल्याला शिवरायांचा 350 वा राज्याभिषेक करण्याचे भाग्य लाभले.

त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळावे, यासाठी उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता. एक शिवसैनिक म्हणून आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत, अशी आपली इच्छा असल्याचेही ते म्हणाले होते.

uday samant, bharat gogawale
Raigad Politics : तटकरेंचा शिंदेच्या लढवय्या आमदारावर कडक प्रहार, विश्वासू साथीदाराला फोडला, राष्ट्रवादीचा थोरवेंसह शिवसेनेला धक्का!

FAQs :

1. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद का सुरू आहे?
शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या पदावर हक्क सांगितल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

2. उदय सामंत यांनी काय वक्तव्य केले?
त्यांनी सांगितले की जानेवारीपर्यंत आचारसंहिता असेल आणि त्यानंतर पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल.

3. या वक्तव्याचा फायदा कोणाला होऊ शकतो?
शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्या आशा वाढल्या आहेत.

4. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरही तिढा आहे का?
होय, नाशिकमध्येही अशीच परिस्थिती असून तिढा अजून सुटलेला नाही.

5. निर्णय कधी घेण्यात येणार?
आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजे जानेवारीनंतर निर्णय अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com