Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Palika News : पालिकेत भ्रष्टाचार झाल्यामुळेच उदयनराजेंकडून 'ईडी' चौकशीची मागणी : शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर

Shivendraraje Bhosale खासदार उदयनराजे यांच्या टीकेला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज प्रत्युत्तर दिले.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : भ्रष्टाचाराच्या आरोपांना समोरासमोर येऊन उत्तर द्यावे हे डायलॉग आता उदयनराजेंनी बदलावेत. ज्या अर्थी ते सातारा पालिकेची ईडीची चौकशीची मागणी करतात, याचा अर्थ पालिकेत भ्रष्टाचार झालाय हे त्यांना मान्य आहे, असे प्रत्युत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंना दिले आहे.

सातारा पालिकेने Satara Palika आकारलेल्या घरपट्टीच्या विषयावरून खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांच्यात सध्या कलगीतुरा रंगला आहे.

खासदार उदयनराजे यांनी काल बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दांत शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली होती. काय बोलायचे असेल तर समोरासमोर या, असे आव्हानही दिले होते. या आव्हानाला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजे भोसले आणि आमचे निवास्थान समोरासमोर आहे. त्यांना जर समोरासमोर येऊन बोलायचे असेल तर त्यांनी खुशाल बोलावे. समोरासमोर येण्याचे सारखे सारखे तेच डायलॉग त्यांनी मारू नयेत. सातारकरांसाठी काहीतरी करावे.

सातारा पालिकेची ईडीची चौकशी लावा असे ते म्हणत आहेत, तर त्यांनी त्याबाबतचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना द्यावे. कारण ते राज्यसभेचे खासदार आहेत, ते वारंवार दिल्लीला जातात. त्यामुळे अशा चौकशीची मागणी ते सहज करू शकतात. Maharashtra Political News

ज्या अर्थी ते सातारा पालिकेची ईडी चौकशीच्या संदर्भाने बोलतात आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. याचा अर्थ पालिकेत भ्रष्टाचार झाला आहे, हे ते त्यांना मान्य आहे. सातत्याने दुसऱ्याविषयी टीका करणे बरे नाही. उदयनराजे यांनी आता सातारकरांसाठी काहीतरी करून दाखवावे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT