Shivaji Maharaj Wagh Nakh : वाघनखं खरी की खोटी याबाबत त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे हा प्रश्न मला विचारुन उपयोग नाही, असे विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वाघनखांबाबतच्या प्रश्नावर केले. दरम्यान, राज्याच्या कारभारात संपूर्ण लोकांचा सहभाग असावा, अशी संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रत्येक वेळेस तारिख, तिथीबाबत वाद का निर्माण केला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवाससथानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वाघनखं Tiger claws कोणती खरी. ती चोरीला गेली होती. तीच ही आहेत का, असे विचारले.
त्यावर उदयनराजे म्हणाले, त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता. पूर्वी आमच्या या राजवाड्यात फार कमी लोक राहात असत.आम्ही सर्वजण अदालत वाड्यात राहात होतो. त्यावेळी राजवाड्यात मोठी चोरी झाली होती. सोन्याचे देव तसेच इतर ऐतिहासिक ऐवज असे सर्व चोरीला गेले होते. त्यावेळी आजूबाजूला वस्ती नव्हती आता ती वाढली आहे.
या वाघनखांबाबत काही जणांकडे ऐतिहासिक दाखले असतील. त्याबाबत विश्वासार्हता असल्याशिवाय ही लोक तसेच विधान करणार नाहीत. मुळात वाघनखं ज्यावेळी होती, त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे मला हा प्रश्न विचारुन उपयोग नाही.
इतिहास संशोधक अनेक दावे करत आहेत, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, आपण देव बघिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या कारभारात संपूर्ण लोकांचा सहभाग असावा, अशी संकल्पना मांडली होती. त्यांच्याबाबत प्रत्येक वेळेस तारिख, तिथीबाबत वाद का निर्माण केला जातो, असा प्रश्न त्यांनी केला.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.