Satara Palika : घरपट्टी प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांची स्थगिती; शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नांना यश

Shivendraraje Bhosale शिवेंद्रसिंहराजेंनी मंगळवारी रात्री मुंबई येथे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
Shivendraraje Bhosale, Eknath Shinde
Shivendraraje Bhosale, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Satara : चतुर्थ वार्षिक पाहणीनतंर सातारा पालिकेने शहरासह विस्‍तारीत भागातील मिळकतधारकांना करमागणी नोटीसा बजावण्‍याची प्रक्रिया सुरु केली होती. ही प्रक्रिया स्‍थगित करण्‍याची मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिका प्रशासनाकडे करत मंगळवारी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. भेटीअंती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन प्रक्रिया स्‍थगित करण्‍याच्‍या सुचना मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांना दिल्‍या.

सातारा पालिकेने शहरासह शाहूपुरी, विलासपुर तसेच इतर विस्‍तारीत भागांतील मिळकतींची चतुर्थ वार्षिक पाहणी करत करमागणी नोटीसा ७२ हजार मिळकतधारकांना बजावण्‍याचे काम हाती घेतले होते. नोटीसा मिळाल्‍यापासून ३० दिवसांत अपील दाखल करण्‍याची मुदत देत अपीलांवरील सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले होते.

यास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हरकत घेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांची भेट त्‍यांना निवेदन दिले होते. यात सदर प्रक्रिया स्‍थगित करण्‍याच्‍या मागणीसाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्‍याचे नमुद केले होते. यानुसार शिवेंद्रसिंहराजेंनी मंगळवारी रात्री मुंबई येथे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Shivendraraje Bhosale, Eknath Shinde
सातारा पालिका घरपट्टी आकारणी प्रक्रिया स्‍थगित करा : शिवेंद्रसिंहराजे

भेटीत त्‍यांनी सातारा पालिकेची लोकनियुक्‍त कार्यकारिणी असित्‍वात नसल्‍याने कारभार प्रशासकाच्‍या मार्फतीने सुरु आहे. लोकनियुक्‍त कार्यकारिणी असित्‍वात नसल्‍याने अपील सुनावणी समितीचे स्‍थापण करता येत नसल्‍याने नियमबाह्य प्रक्रिया स्‍थगित करण्‍याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना फोनवरुन घरपट्टी प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले.

Shivendraraje Bhosale, Eknath Shinde
Satara : खासदार उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदींची भेट; करणार ही मागणी...

याबाबतची माहिती बुधवारी शिवेंद्रसिंहराजेंनी विलासपूर येथील एका विकासकार्यक्रमाच्‍या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नागरीकांना दिली. याअनुषंगाने अभिजित बापट यांच्‍याशी संपर्क साधला असता, त्‍यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन घरपट्टी आकारणी प्रक्रिया स्‍थगित करण्‍याचे आदेश दिल्‍याचे सांगितले.

Shivendraraje Bhosale, Eknath Shinde
Satara : शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष नको.. अन्यथा, हातात वाडगं घेऊन बसावे लागेल... उदयनराजे भडकले

नागरीकांना करमागणी नोटीसा बजावण्‍यात येत असून त्‍यावरील अपील दाखल करण्‍याची प्रक्रिया सुरुच राहणार आहे. दाखल अपीले एकत्रित केल्‍यानंतर त्‍यावरील सुनावणी कधी घ्‍यायची किंवा ती पुढे ढकलायची याविषयीचे आदेश अद्याप येणे बाकी आहेत. कदाचित अपीलावरील सुनावणी शासन आदेशानुसार पुढे जावू शकते.

-अभिजित बापट, मुख्‍याधिकारी, सातारा.

Shivendraraje Bhosale, Eknath Shinde
Satara : 'कास'च्या बांधकामांना आधी नियमावली लावा; मग खुशाल अतिक्रमणे काढा...शिवेंद्रराजे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com